Tuesday, May 21, 2024

करिअरच्या सुरुवातीला विद्याला मुंबईतील 5 स्टार हॉटेलसमोर मागावी लागली हाेती भीक, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालनने अनेक दिवसांपासून फिल्मी जगापासून अंतर ठेवले आहे. अभिनेत्री विद्या बालन सध्या तिचा आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट ‘नियात’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. चला, तर मग जाणून घेऊया काय म्हणाली अभिनेत्री.

‘नियात’ चित्रपटाच्या प्रमाेशदरम्यान अभिनेत्री विद्या बालन (vidya balan) हिने तिच्या संघर्षाचे दिवस आठवले आणि सांगितले की, तिला इंडस्ट्रीत येण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी किती कष्ट करावे लागले. विद्याने असेही सांगितले की, तिने भिकारी म्हणून काम केले होते आणि तेही जिम जॅम बिस्किटांच्या पॅकेटसाठी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

अलीकडेच विद्याने एका मुलाखतीत सांगितले की, “आमचा आयएमजी म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुप होता. ते दरवर्षी भारतीय शास्त्रीय संगीत कॉन्सर्ट, शास्त्रीय संगीत कॉन्सर्ट आयोजित करत असत. ही कॉन्सर्ट तीन दिवस रात्रभर चालायचे.  मी त्याच आयोजन समितीत होते. मी स्वयंसेवक होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आम्ही मदत करायचो आणि रात्री शो संपला की, नरिमन पॉइंटवर फिरायला जायचो.”

विद्या पुढे म्हणाली, “एकदा मला चॅलेंज देण्यात आले होते की, मला कॉफी शॉपचे दार ठोठावून त्यांच्याकडे काही खायचे मागायचे आहे. मी अभिनेत्री आहे हे त्यांना माहीत नव्हते. मी दार ठोठावत राहिले. सर्व लाेक चिडचिड करू लागले. मी खूप वेळा ठोकले. मी म्हणाली, प्लीज मला भूक लागली आहे. कालपासून मी काही खाल्ले नाही. काही वेळाने ते लोक दुसरीकडे पाहू लागले. यानंतर माझा मित्राला लाजीरवाणी वाटले आणि त्याने मला परत येण्यासाठी सांगितले आणि मी पैज जिंकली.”

विद्या बालनच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘द डर्टी पिक्चर’, ‘भूल भुलैया’, ‘हमारी अधूरी कहानी’, ‘जलसा’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(neeyat fame vidya balan reveals she pretended to be a beggar outside a five star hotel as a dare )

आधिक वाचा- 
‘मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं’, ट्रान्सजेंडर सुष्मिता सेनचे ‘ताली’ मोशन पोस्टर रिलीज
उर्फीच्या नव्या आऊटफिटने ओलांडल्या सर्व मर्यादा; युजर्स ट्रोल करत म्हणाले, ‘तिने हे देखील का घातले…’

हे देखील वाचा