सुष्मिता सेन तिच्या आगामी वेब सीरिज ‘ताली’मुळे चर्चेत आली आहे. सुष्मिता लवकरच ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. खरं तर, सुष्मिताने तिच्या आगामी वेब सीरिज ‘ताली’ चे मोशन पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यामध्ये तिचा एक वेगळा आणि अनोखा अवतार पाहायला मिळाला आहे.
सुष्मिता सेन (sushmita sen) हिची ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म जियाे सिनेमावर रिलीज होणार आहे. पोस्टरमध्ये सुष्मिताने कपाळावर मोठा लाल ठिपका लावलेला दिसत आहे. या ट्रेलरमध्ये ती म्हणताना ऐकू येते की,’तू मुश्किल दे भगवान मैं आसान करूं, तू दे दे तपती रेत, मैं गुलिस्ता करूं, तू लाख गिरा दे बिजली मुझपे, मैं तो सतरंग बनूं…मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं.‘
‘ताली’चे मोशन पोस्टर पाहून चाहत्यांची उत्कंठाही चांगलीच वाढली आहे. सुष्मिताला या अवतारात पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या पाेस्टवर एका चाहत्याने कमेंट केली की, ‘या मास्टरपीसची वाट पाहू शकत नाही, लेडी बॉस…’, तर दुसर्या चाहत्याने लिहिले, ‘सुपर एक्सायडेट फाॅर द मास्टरपीस’
View this post on Instagram
‘ताली’ ही ट्रान्सजेंडर गौरी सावंतची कथा आहे
मंडळी, ‘ताली’ ही गौरी सावंतची कथा आहे, जिचा जन्म गणेश म्हणून झाला होता. 2013मध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेत गौरी याचिकाकर्त्यांपैकी एक होती. या संपूर्ण प्रकरणात तिची महत्त्वाची भूमिका होती. 2014मध्ये या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला होता, ज्यामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना तृतीय लिंग म्हणून मान्यता देण्यात आली होती.
सुष्मिता सेन स्टारर वेब सीरिज ‘ताली’चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. सुष्मिता सेनने ‘आर्य’ आणि ‘आर्या 2’ च्या यशानंतर नुकतेच ‘आर्य 3’ चे शूटिंग पूर्ण केले होते. तिची ही मालिका लवकरच ओटीटीवर दमदार कमाई करण्यास तयार आहे.(bollywood actress sushmita sen shared upcoming web series taali motion poster story based on transgender gauri sawant )
आधिक वाचा-
– ‘बाईपण भारी देवा’ पाहून थिएटरबाहेर येताच आदेश बांदेकर भावुक; केदार शिंदेंना मारली मिठी
–‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?