‘बिग बॉस ओटीटी’ या रियॅलिटी शोमधील स्पर्धक जिथे त्यांच्या खेळाबद्दल चर्चेत असतात, तेवढेच जास्त ते एकमेकांशी भांडणामुळे असतात. बिग बॉस ओटीटीच्या घरात पुन्हा एकदा अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि गायिका नेहा भसीन यांच्यात भांडणं झाली आहेत. अनेकदा या दोघांमध्ये भांडणे आणि वाद होतात. आता दिव्या अग्रवाल आणि नेहा भसीन यांच्यात घाणेरड्या अंडरगार्मेंट्सवरून भांडण झाले आहे.
खरं तर, मंगळवारी (७ सप्टेंबर) प्रसारित झालेल्या भागात, दिव्या अग्रवाल बाथरूममध्ये असते. तिथे तिला नेहा भसीनचे ठेवलेले घाणेरडे अंडरगारमेंट्स दिसतात. हे पाहिल्यानंतर, दिव्या शमिता शेट्टी आणि मुस्कान जट्टानाला विचारते की, ते अंडरगार्मेंट्स त्यांचे आहेत का? यानंतर, दिव्या इतरांना विचारते की, बाथरूममध्ये ठेवलेले घाणेरडे अंडरगारमेंट्स कोणाचे आहेत?
यानंतर नेहा भसीन म्हणते की, ते घाणेरडे अंडरगार्मेंट्स तिचे आहेत. नेहा यासाठी माफी मागते आणि म्हणते की, ती त्यांना साफ करायला विसरली. यावर दिव्या अग्रवाल नेहाला सांगते की, हे किती घाण आहे. दिव्याकडून हे ऐकल्यानंतर नेहा भसीन संतापते. ती उत्तर देत म्हणते की, “मला प्रत्येक गोष्टीवर तुझ्या अतिरिक्त मताची गरज नाही. तू या घरात असणे हे घाणेरडे आहे. खूप जास्त होत आहे.”
नेहा भसीन एवढ्यावरच थांबली नाही. ती दिव्याला पुढे बोलते की, “मी ते धुण्यासाठी इथे ठेवले आहे. तू एक घाणेरडी स्त्री आहेस. तू जे काही बोलतीस ना ते सर्व घाणेरडे आहे. मी शेअर केल्याबद्दल माफी मागते, तुम्ही हा मुद्दा का बनवत आहात? ही फक्त एक छोटी गोष्ट आहे आणि मोठी गोष्ट नाही.” यावर दिव्या हसून म्हणतेे की , “मी जे काही बोलते ते घाणेरडे आहे. तू मला घाणेरडी म्हणू शकते.” नेहा भसीन म्हणाली की, “मी मेडिकल रूममध्ये होते आणि आताच तिथून आले आहे. ही फक्त एक अंडरवेअर आहे.”
त्याचबरोबर लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’ ही ‘बिग बॉस १५’ मध्ये बदलणार आहे. बिग बॉस १५ लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करतो, तर अभिनेता सलमान खान हा ‘बिग बॉस १५’ होस्ट करणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी










