Tuesday, May 28, 2024

बर्थडे गर्ल ‘नेहा’ : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिकांवर लगावला होता यौन शोषणाचा आरोप, वाचा जीवनप्रवास

‘लाँग गवचा’, ‘जग घुमेया’, ‘कुछ खास’, ‘दिल दिया गल्ला’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देऊन प्रत्येक तरुणाच्या मनात राज्य करणारी गायिका म्हणजे नेहा भसीन.

नेहा सध्या रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ मध्ये स्पर्धक म्हणून आहे. या शोमधील तिचा खेळ पाहून तिचे सगळेच चाहते प्रभावित झाले आहेत. तसेच ती बिग बॉस ओटीटीचा देखील भाग होती. ती हा शो जिंकू शकली नाही, परंतु तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. अशातच नेहा शनिवारी(१८ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

नेहाचा जन्म १८ नोव्हेंबर १९८२ मध्ये दिल्ली येथे झाला आहे. नेहाने केवळ हिंदीच नाही तर, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील गाणी गायली आहेत. तिच्या आवाजाने तिने सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. नेहाचे वडील अशोक भसीन आणि आई रेखा भसीन हे दोघेही दिल्लीमध्ये राहतात.

कॉलेजमध्ये शिक्षण चालू असताना चॅनल वीचा शो ‘कोक वी पॉपस्टार’ साठी तिने ऑडिशन दिले होते. या शोमध्ये तिने पहिल्यांदा संपूर्ण भारताचा ऑल गर्ल्स बॅंड बनवला होता आणि त्याचे नाव ‘विवा’ ठेवले होते. त्यावेळी ती केवळ १८ वर्षाची होती. तिचा हा बॅंड खूप चांगला सुरू झाला होता परंतु हा बॅंड जास्त दिवस टिकू शकला नाही. (Neha Bhasin Birthday special : let’s know about her life)

नेहा भसीन नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिने एक वेळा बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्यावर यौन अत्याचाराचा आरोप लावला होता. नेहाने सांगितले होते की, ही घटना घडली तेव्हा ती २१ वर्षाची होती.

नेहाने तिच्या एका मुलाखतीत ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ मधील काही आठवणी उजाळा देत सांगितले होते की, या शोमधील एका एपिसोडमध्ये स्टेजवर जाण्यास तिला नकार दिला होता; कारण तिने छोटे कपडे घातले होते. तिने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये दोन दशक पूर्ण केले होते. तिच्या या करिअरमध्ये तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिने कमी वयात तिचे नाव कमावले आहे.

आधिक वाचा-
CWC 2023 Final: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाला असं चेचून काढा…’
‘पुकार’ चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण; शूटिंगदरम्यान करीनाने अमिताभ यांचे पाय धरून केली होती ‘ही’ विनवणी

हे देखील वाचा