Friday, September 20, 2024
Home मराठी ‘बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत, पण…’ अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

‘बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत, पण…’ अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका व आपल्या परखड विचाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:च असं विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच शरद पोंक्षे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही सतत चर्चेत असतात. मराठी सिनेसृसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आपल्या अभिनयाइतकेच ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी तसेच बिंनधास्त वक्तव्यांसाठी चर्चेत येतात. विविध विषयांवर ते आपली स्पष्ट मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं आहे. स्पष्टवक्तेपणामुळे शरद पोंक्षे बऱ्याचदा वादच्या भोवऱ्यात अडकतात. नुकतेच त्यांनी बौद्ध, जैन, लिंगायत व शीख धर्माबद्दल भाष्य केले आहे. शरद पोंक्षे यांची रोखठोक वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी अनेकदा आपले रोखठोक मत मांडत भाष्य केले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टिका देखील होते.

ते म्हणीले की, ” हे सगळे हिंदूच आहेत. बौद्ध, जैन, लिंगायत या फक्त वेगवेगळ्या शाखा असून त्यांची उपचार करण्याची पद्धत वेगळी आहे. गौतम बुद्ध देखील आमच्याच मातीत जन्माला आले आहेत. ते काही दुसऱ्या राष्टातून आलेले नाहीत. बुद्ध देखील आमचाच एक आवतार आहेत. त्यांनी फक्त कर्मकांडांची पद्धत वेगळी केली आहे. तर बौद्ध धर्म, जैन आपल्यापासून वेगळे होऊ लागले आहेत. शीख वेगळा धर्म असे म्हटले जाते, पण कुठला वेगळा धर्म आहे? या सगळ्या मूळ हिंदू धर्माच्या आतल्या पोटशाखा आहेत.” यावेळी त्यांनी हे धर्म वेगळे नसून सगळे राम, कृष्ण व भगवद्गीताच मानत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेतून झळकत आहे. त्यातून ते प्रेक्षकाचे मनोरंजन करत आहेत. तसेच लवकरच त्यांचे बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा प्रेक्षतकांना रंगमंचावर बघायला मिळणार आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आहे. (Marathi actors sharad ponkshe says buddhists jains lingayats sikh all are hindus talks about gautam buddha)

अधिक वाचा- 
दृष्ट लागावी इतके सुंदर आहे उर्मिला कोठारेचे सौंदर्य, फोटोवर खिळल्या लाखो नजरा
‘गदर 2’ची कमाई पाहून हेमा मालिनी झाल्या सनीवर फिदा; म्हणाल्या, ‘मी सनीला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा