Thursday, April 18, 2024

प्रेग्नेंसी आणि घटस्फोटाच्या बातम्यांनी नेहा कक्करला झाला मानसिक त्रास; म्हणाली, ‘मला माझे सत्य माहित आहे’

गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिला संगीत विश्वात हिट मशीन म्हणून ओळखले जाते. तिने आपल्या आवाजाने जे गाणे गायले ते गाणे सुपरहिट ठरते. 2002 मध्ये नेहा ‘इंडियन आयडॉल’ या रिॲलिटी शोला जज करताना दिसली होती. या शोनंतर नेहा इतर कोणत्याही टेलिव्हिजन शोमध्ये दिसली नाही. त्याचवेळी, अफवाचा बाजार होता की नेहाच्या वैयक्तिक आयुष्यात काही चांगले चालले नाही, त्यामुळे तिने टीव्हीपासून ब्रेक घेतला आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नेहा तिच्या लग्न आणि करिअरबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली.

नेहा कक्करने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. नुकतेच जेव्हा तिला विचारण्यात आले की ती कोणत्याही शोमध्ये का दिसत नाही. या प्रश्नाच्या उत्तरात नेहा म्हणाली, “खर सांगू, मी खूप थकले होते. हा थकवा मला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रास देत होता. मला माझे 100 टक्के द्यायचे होते, म्हणून मी ब्रेक घेतला.”

नेहा पुढे सांगते, “मला माझ्यासाठी ब्रेक हवा होता. मी खूप दिवसांपासून काम करत आहे. थोड्या वेळाने मला स्वतःला वेळ द्यावा असे वाटू लागले, म्हणून मी ब्रेक घेतला. मीही माणूस आहे आणि मलाही अफवांचा फटका बसतो. गरोदरपणाच्या बातम्यांनी मला खूप त्रास व्हायचा, पण सत्य काय आहे हे फक्त मलाच माहीत आहे.”

गेल्या काही महिन्यांपासून नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या विषयावर नेहाला विचारले असता ती म्हणाली, ‘हे बघ, लग्न झाल्यापासून मला दोनच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पहिले म्हणजे मी आई होणार आहे आणि दुसरे म्हणजे मी घटस्फोट घेणार आहे, पण हे सत्य नाही. मी माझ्या पतीला किती वेळ द्यायचा आणि किती काम करायचे हे मी ठरवेन.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘घटस्फोटाचा मुलगा आझादला धक्का बसू नये म्हणून…’ किरण रावने केला आमिरसोबतच्या नात्याचा खुलासा
Kangana Ranaut: ‘हीच ती योग्य वेळ…’ कंगना रणौत निवडणुक लढवणार?

हे देखील वाचा