बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करने आपल्या आवाजाने अवघ्या प्रेक्षकवर्गाला मंत्रमुग्ध केले आहे. तिची गाणी बघता बघताच व्हायरल होतात. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडेच तिचे समोर आलेले काही फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नेहा कक्कर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आयफेल टॉवरसमोर उभी असलेली दिसत आहे. विशेष बाब म्हणजे, यात नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग खुलेआम रोमान्स करताना दिसत आहेत.
भररस्त्यात केले लिप-लॉक
या व्हायरल फोटोमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग भररस्त्यात लिप-लॉक करताना दिसत आहेत. स्वतः नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “प्रेमाचे शहर पॅरिस खूप सुंदर दिसत आहे. पण तेव्हाच जेव्हा तू माझ्यासोबत असतोस, तुझ्याशिवाय नाही.” (neha kakkar and rohanpreet singh liplock picture viral on social media singer go cozy in paris)
व्हायरल होतायत फोटो
या सुंदर कॅप्शनसह नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंगला पोस्टमध्ये टॅग केले आहे. नेहाच्या पतीनेही या फोटोंवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहनप्रीतने लिहिले की, “मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो.” शिवाय नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने या फोटोला वर्षातील सर्वात सुंदर फोटो म्हणून संबोधले असून, हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
नेहाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिची रोहनप्रीत सिंगसोबत बरीच गाणी रिलीझ झाली आहेत. या दोघांनी एकत्र गायलेली जवळपास सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. गेल्या काही दिवसांत नेहा कक्करने वेगवेगळ्या जॉनरमध्येही प्रयत्न केले आहेत. मात्र हनी सिंगसोबतचे तिचे ‘कांटा लगा’ हे गाणे अपेक्षित यश मिळवू शकले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती
-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा
-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…










