Monday, June 24, 2024

पारदर्शी ब्रालेट आणि लांब कोट घातलेल्या नेहा कक्करचा पॅरिसच्या रस्त्यांवर दिसला कातिलाना अंदाज

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या मेहनतीने आणि संघर्षाने आपले स्थान निर्माण केलेली क्युट आणि सुंदर अशी गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहाने या क्षेत्रात नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. आज नेहा प्रत्येक संगीतकाराची पहिली पसंत आहे. प्रत्येक सिनेमात नेहाचे एक गाणे तरी असतेच असते. नेहाने आतापर्यंत गायलेले सर्वच गाणे तुफान हिट झाले. नेहमीच आपल्या व्यायसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारी नेहा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाइमलाईट्मधे आली आहे.

सध्या नेहा तिच्या नवऱ्यासोबत रोहनप्रीतसोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपचे नेहाने अनेक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये नेहा आयफेल टॉवरसमोर रोहनप्रीतला किस करताना देखील दिसली. तिचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या ट्रीपच्या फोटोंसोबतच नेहा तिच्या ड्रेसमुळे देखील चर्चेत आली आहे. नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक अनेकांना आवडला असल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे.

नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला असून, या ड्रेसमध्ये लाल रंगाचे लॉन्ग जॅकेट, लाल रंगाची पँट आणि ब्लॅक रंगाचे ब्रालेट घातले, त्यावर ब्लॅक बेल्ट देखील लावला आहे. तिने तिच्या केसांना मोकळे सोडले असून, गळयात नाजूक नेकपीस, रेड लिपस्टिक आणि ब्लॅक पर्स घेतली आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत असून, तिच्या पूर्ण लुकबद्दल सांगायचे झाल्यास तिने वर्ल्ड ऑफ सारा या ब्रँडचा ड्रेस घातला आहे.

नेहा तिच्या या कातिल लूकमध्ये पॅरिसच्या रस्त्यांवर सोलो आणि नवऱ्यासोबत एकापेक्षा एक भारी पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘पॅरिसच्या रस्त्यांवर’. सध्या नेहाचा हा लूक आणि हे फोटो नेहाला खूपच पब्लिसिटी मिळवून देत आहे. मागील काही दिवसांपासून नेहा प्रेग्नेंट असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र नेहाने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा