Sunday, February 23, 2025
Home टेलिव्हिजन कानाखाली मारु का? नेहा कक्करवर भडकला अनू मलिक

कानाखाली मारु का? नेहा कक्करवर भडकला अनू मलिक

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिने साध्या घरातून येऊन बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडली आहे. अगदी साध्या कुटुंबातून आलेली नेहा आज लाखो लोकांच्या मानवर राज्य करतेय. खूपच कमीवेळात तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिने आपल्या दमदार गायिकेने चाहत्यांना आपलेसे केले आहे. नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मिडियावर तिचे लाखो चाहते तिला फॉलो करतात. नुकताच तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेहा क्कर(Neha Kakkar) अतिशय गरिब घरातून आली आहे तिचा गायिका बनण्याचा खडतर प्रवास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे तिला अनेक लोक प्रेरणास्थान मानत आहेत. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तिचे व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. मात्र, कधी कधी तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो. नेहा कक्कर ही नुकतच तिने गायलेल्या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्या अडकली होती आणि त्यामुळे तिला जोरदार ट्रोलही केले होत. फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) आणि नेहाचा सोशल मीडिया वाद जोरदार पेटला होता. त्यामुळे नेहा खूपच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा नेहाच्या चर्चांना ऊधान आले आहे.

नेहाचा कक्करचा इंडियन आयडल मधील ऑडिशनमध्ये गाणे गात असतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा ‘रिफ्युज'(Refugee) या चित्रपटातील ‘एसा लगता है’ हे गाणे गाताना दिसून येत आहे. त्यावेळेस या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून अनु मलिक(Anu Malik), फरहान खान(Farhan khan), आणि सेनू निगम(Sonu Nigam) हे गायक होते. नेहाचे गाणे अनु मलिकला खूप आवडते आणि तो असेही म्हणतो की “तुझे गाणे ऐकूण मला माझ्या कानाखाली मारावी असे वाटत आहे.” मात्र फरहान खान आणि सोनू निगमला नेहाचे गाणे आवडत नाही आणि तिच्या गाण्यामध्ये चुका काढतात.

हा व्हिडिओ 2006 चा इंडियन आयडलच्या आॉडिशनचा आहे ज्यामध्ये नेहा कक्करच्या गाण्यामध्ये चुका काढून तिला कार्यक्रमाच्या बाहेर काढतात. मात्र नेहा कक्कर तिथेच थांबत नाही ती आणखी स्वत:वर मेहनत करते आणि पुढे एवढी चांगली गायिका बनते की, आज तीच त्या कार्यक्रमाची परिक्षक बनली आहे. नेहाचा हा खडतर प्रवास सगळ्यांनाच प्रेरणा देण्यासारखा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! प्रभासने शेअर केला ‘आदिपुरुष’ सिनेमाचा पोस्टर, ‘या’ दिवशी रिलीज होणार टीझर
‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ठार वेडा झालेला चाहता, आख्खी जमीनच करून बसला होता नावावर
बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला

हे देखील वाचा