Friday, March 31, 2023

खुशखबर! प्रभासने शेअर केला ‘आदिपुरुष’ सिनेमाचा पोस्टर, ‘या’ दिवशी रिलीज होणार टीझर

‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभास हा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याचे लाखो चाहते खूप दिवसांपासून त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रभास ‘बाहुबली 2’नंतर ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ या चित्रपटात होता. आता तो पुन्हा एकदा चाहत्यांना नवीन चित्रपटातून भेटणार आहे. प्रभासने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रेक्षकांना खुशखबर दिली आहे.

लाखो चाहते प्रभास (Prabhas) याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्याने आता प्रेक्षकांच्या आतुरतेचा बांध तोडला आहे. नुकतेच निर्मात्यांनी प्रभासच्या नवीन चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना खुश केले आहे. प्रभासच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या नवीन चित्रपटाचे पोश्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये प्रभासचा हटके लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटामध्ये प्रभास आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरसोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरची तारीखही सांगितली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभासचा लूक पाहून असे दिसून येत आहे की, तो श्रीरामाच्या अवतारात असून त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि तो वरच्या बाजूने धनुष्य बाण चालवताना दिसून येत आहे. या पोस्टरच्या मागच्या बाजूला वीज चमकताना दिसत आहे आणि असे वाटत आहे की, प्रभास समुद्रामध्ये थांबला आहे.

आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर अभिनेता प्रभास याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सुरुवात करा…अयोध्या यूपीमधील सरयू नदीच्या काठावर जादूई प्रवास करण्यासाठी आमच्यासोबत सामील व्हा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

हेही वाचा- बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला

अभिनेता प्रभासने या कॅप्शनसोबत चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाची वेळही सांगितली आहे. त्याने म्हटले की, “‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर (दि. 2 ऑक्टोबर 2022) दिवशी 7 वाजून 11 मिनिटांनी अयोध्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट 12 जोनेवारी, 2023 मध्ये आयनॉक्स आणि थ्रीडी(3D) सिनेमागृहात पाहायला मिळणार आहेत.” आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ठार वेडा झालेला चाहता, आख्खी जमीनच करून बसला होता नावावर
सिनेमासोबतच राजकारणाचं मैदानही गाजवणार कंगना रणौत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

हे देखील वाचा