Saturday, June 29, 2024

अरे देवा! जमिनीवर लोळून लोळून हे काय करतेय नेहा कक्कर? पाहून तुम्हीही पडाल गोंधळात

बॉलिवूडची टॉप गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आपले मोठे मन आणि बोल्डनेसमुळे खूप चर्चेत असते. नेहा केवळ गाण्यामुळेच नाही, तर सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओंमुळेही चर्चेत असते. नुकताच नेहा कक्करचा एक व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. या व्हिडिओमध्ये ती नागिण डान्स करताना दिसत आहे. नेहाचा पती रोहनप्रीत सिंगसोबत (Rohanpreet Singh) डान्स करताना दिसत आहे.

नेहा कक्कर एक अप्रतिम गायिका तर आहेच, पण ती एक चांगली डान्सर देखील आहे. नुकतीच नेहा मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तिकडे नेहाने पार्टीत अनेक गाण्यांवर डान्स केला, मात्र या पार्टीत नेहाचा नागिण डान्स सगळ्यात धमाकेदार होता. नेहाने पती रोहनप्रीतसोबत चक्क जमिनीवर लोळत नागिण डान्स स्टेप्स केल्या. नेहाचा हा डान्स पाहून पाहुणे लोटपोट झाली, पण ती अजिबात लाजली नाही आणि भरभरून मजा घेतली. (neha kakkar naagin dance video viral)

नेहाचा हा व्हिडिओ रोहनप्रीतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, ‘जर तुमचा पार्टनर दारू न पिऊन असा डान्स करत असेल तर लगेच त्याच्याशी लग्न करा.’ रोहनने या व्हिडिओला ‘मिस यू लाडो, आजा जल्ली प्लीज नेहू’ असे कॅप्शन दिले आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:

https://www.instagram.com/reel/CfyB6CQM1hl/?utm_source=ig_embed&ig_rid=6a2d2dbc-8de5-4cfe-97af-e79f964abad3

नेहा आज खूप मोठी स्टार बनली आहे. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी, ती सतत इंस्टाग्रामवर सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण त्यांच्यासोबत शेअर करत असते. नेहाचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी कमेंट करत या जोडप्याच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले की, “म्हणूनच आम्ही या मुलीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडतो.”

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. चंदिगडमध्ये ती पहिल्यांदा रोहनप्रीतला भेटली. दोघांनी एकत्र काही म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत. नेहा आणि रोहनची प्रेमकहाणीही खूप चर्चेत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा