Saturday, June 29, 2024

‘हँसते-हँसते कट जाए रस्ते’ म्हणत गायिका नेहा कक्करने केले पती रोहनप्रीतसोबत गिटार वाजवतानाचे फोटो शेअर

आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. एकेकाळी नेहाला गाण्याचे कार्यक्रम सादर करण्यासाठी खूप कमी मानधन मिळायचे, परंतु तिच्या आवाजाच्या जादूने अशी काही कमाल करून दाखवली की, तिने कमी वयातच खूप प्रसिद्धी आणि यश मिळवले. नेहाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच कोणते ना कोणते फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवरही चाहते आपले प्रेम लुटवत असतात. नुकताच नेहाने आपला एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. या फोटोलाही चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.

या फोटोमध्ये नेहा पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसत आहे. या फोटोत दोघेही घरात जमिनीवर बसले आहेत, आणि दोघांच्या हातात गिटार आहे. ज्यात हे दोघेपण खूपच हटके आणि आनंदी दिसत आहेत.

नेहाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, “लॉकडाऊन टाईम्स. हँसते-हँसते कट जाए रस्ते, जिंदगी यूँ ही चलती रहे. खूप प्रेम.”

नेहाच्या प्रसिद्धीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, तिच्या या फोटोला तब्बल १९ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. पती रोहनप्रीत सिंगनेही कमेंट करत ‘खूप प्रेम जोडीदार,’ असे म्हटले आहे.

नेहा कायमच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी जोडली गेली आहे. नेहाचे इंस्टाग्रामवर ५६ मिलियन फॉलोवर्स आहेत. सध्या नेहा लॉकडाऊन काळात पण खूप मज्जा करताना दिसत आहे. या आधीपण तिने लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेयर केले होते, ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टीव्हीवर सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘टॉपलेस’ बोल्ड अवतार पाहून चाहतेही चक्रावले!

-व्हिडिओ: अमिताभ अन् जया बच्चनसोबत कॅटरिना कैफने केली भावुक जाहिरात शूट, बनली बिग बींची मुलगी

-अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘दिल है दीवाना’ या नवीन गाण्यावरील डान्सची धमाल, मिळाले २ कोटी हिट्स

हे देखील वाचा