बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार कॅटरिना कैफ, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एका व्यावसायिक जाहिरातीमध्ये दिसले आहेत. जाहिरात ही भावनिक स्वरूपाची आहे. जाहिरातीमध्ये अमिताभ यांच्यासोबत कॅटरिनाचे ट्युनिंग पाहण्यासारखे आहे. कॅटरिना, बिग बी आणि जया यांच्या एका नवीन ज्वेलरी जाहिरातीमध्ये कॅटरिना ही सुंदर वधू बनलेली दिसत आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही जाहिरात शेअर केली आहे, ज्यात ते पत्नी जया बच्चन आणि अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत दिसत आहेत. जाहिरातीमध्ये कॅटरिना ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली आहे. अमिताभ एका प्रेमळ वडिलांची भूमिका साकारताना दिसले, जे आपल्या मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाही. ते एकत्र नाचतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात, आणि लग्नाच्या दिवशी कॅटरिनाला जड सोन्याच्या दागिन्यांनी सजावतात.
अमिताभ यांनी हा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे की, “नव्या नात्याची नवी सुरुवात. एक नातं जे विश्वास, प्रेम आणि परंपरेने जोडले गेले आहे. एवढी चांगली वेळ एकत्र येण्यालाच मुहूर्त म्हणतात. लग्नाच्या दागिन्यांचे अनोखे प्रदर्शन, जे भारतीय वधूच्या आनंदाचे प्रतीक आहे.”
या जाहिरातीच्या तेलुगु आवृत्तीत नागार्जुन वडील आणि रेजिना कॅसेंड्रा वधू म्हणून आहेत. या आवृत्तीत अमिताभ आणि जया यांनी वराच्या पालकांची भूमिका साकारली आहे. मागील वर्षी जानेवारीत या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले होते. यानंतर अमिताभ यांनी शूटिंगची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर शेअर केली.
वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अमिताभ बच्चन नागार्जुनबरोबर अयान मुखर्जीच्या पुढच्या चित्रपटाच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहेत. याव्यतिरिक्त अमिताभ ‘मायडे’, ‘झुंड’ यांसारख्या चित्रपटातही दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-