Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘दिल है दीवाना’ या नवीन गाण्यावरील डान्सची धमाल, मिळाले २ कोटी हिट्स

अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘दिल है दीवाना’ या नवीन गाण्यावरील डान्सची धमाल, मिळाले २ कोटी हिट्स

बॉलिवूड जगात अनेक  चित्रपटासोबत गाणेपण  प्रसिद्ध होत असतात. हल्ली गाण्यांचा अल्बम तयार करण्यावर भर दिला जातो. अशी गाणे सुद्धा मोठया  प्रमाणावर चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. असंच एक गाणं म्हणजे ‘दिल है दीवाना.’ या रोमँटिक नृत्याच्या ट्रॅकच्या माध्यमातून अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंग आणि भूषण कुमार हे त्रिकुट आपल्याला थिरकवण्यासाठी तयार झाले आहेत. राधिका राव आणि विनय सप्रू या दिग्गज जोडीने दिग्दर्शित केलेल्या या गाण्यामध्ये अर्जुन आणि रकुल यांनी अत्यंत रोमांचक पद्धतीने नृत्य सादर केले आहे.

या गाण्यात त्यांचा उत्साह आणि लय अत्यंत आकर्षक पद्धतीने खुलून दिसत आहे. योगायोगाने, सुंदर अभिनेता आणि जबरदस्त आकर्षक अभिनेत्री पहिल्यांदाच एका गाण्यामध्ये एकत्र दिसत आहे, त्याचे संपूर्ण श्रेय भूषण कुमार यांना जाते.

दर्शन रावल आणि अभिनेत्री गायिका जारा खान यांच्यासह तनिष्क बाग यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल है दीवाना’ हे अतिशय छान आणि उत्साही गाणे आहे. या गाण्याला आतापर्यंत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार म्हणतात, “हे गाणे एक उत्तेजक, उडत्या लयीचे आणि नृत्याने भरलेला गाणं आहे. या गाण्याचा प्रत्येक भाग पूर्ण विचार करून उत्कृष्ठ बनवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आहेत, या व्हिडिओचे चित्रीकरण संगीत, आवाज, आणि गाण्याचे शब्द हे शानदार आहेत. हे गाणे प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जा अब पलट के देखब ना’ नीलकमल सिंग आणि काजल राघवानीचे सॅड साँग व्हायरल, गाण्याला मिळतेय चाहत्यांची पसंती

-एकदम भारी! गुंजन सिंगचं भोजपुरी गाणं होतंय जोरदार व्हायरल, अवघ्या १० दिवसात मिळाले ५१ लाखांपेक्षाही अधिक हिट्स

-दोन दिवसांतच भोजपुरी गाण्याने रचलाय युट्यूबवर विक्रम, राकेश मिश्राच्या गाण्याला चाहत्यांच्या मिळतायत जोरदार हिट्स

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा