बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही तिच्या गाण्यांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे आजकाल चर्चेत असते. नेहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नेहाचे फॅन फॉलोविंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. गाण्यांसोबत तिच्या स्टाईल आणि ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील तिच्या अशाच एका ड्रेसमुळे खूप चर्चेत आहे.
नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने तिच्या ज्वेलरीसाठी तिच्या सासूचे आभार मानले आहे. नेहाने अजून एक हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “काही महिन्यापूर्वी जेव्हा मी बारीक होते.”
नेहाने दिल्ली मधील बेस्ट डिझायनर महिमा महाजनने डिझाईन केलेला ड्रेस घातला आहे.या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे, आणि केसांना कर्ल केले आहे. तिच्या या ड्रेसची किंमत 38, 900 रुपये आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या वजनामुळे नेहा खूपच चर्चेत होती. त्यांनतर तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती पुशअप्स करताना आणि जॉगिंग करताना दिसत होती.
सध्या नेहा तिचा पती रोहनप्रीतसोबत घरी दर्जेदार वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईमधील अनेक शोची शूटिंग थांबली आहे. त्यामुळे नेहा देखील आता घरीच आहे. ती नेहमी रोहनप्रीतसोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बधाई हो! सनी लिओनीच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिल्या खास टिप्स