अभिनेत्री नेहा पेंडसेने स्वतःचे असे मनोरंजन क्षेत्रात नाव केलेले आहे. नेहा पेंडसेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मराठी, बॉलिवूड, टॉलिवूड या तीन इंडस्ट्रीमध्ये तिने स्वतःचे असे नाव केले आहे. सध्या ती ‘भाभी जी घर पर है’ या हिंदी मालिकेत भाभीचे काम करत आहे. या व्यक्तिरेखेने तिला खूप ओळख मिळवून दिली. तिच्या लूकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नुकतेच तिने निळया रंगाच्या मोनोकिनीमधील मिरर सेल्फि पोस्ट केला आहे. त्याची चाहत्यांना फार भुरळ पडली आहे. हा तिचा नवा अंदाज चाहत्यांना फार भावला आहे.
नेहा पेंडसेचा हा नवा लूक म्हणजे तिने स्वतःच्या बॉडीवर काम केले आहे. तिने स्वतःचे वजन कमी केले आहे. ही तिची टोन्ड फिगर मिरर सेल्फिमध्ये दाखवताना ती म्हणते की, ” मी तुम्हाला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.” नेहा पेंडसे जिम डायट स्किन केअर रुटीने या सगळ्या गोष्टी सांभाळून शूटिंग करत असते. स्वतःला मेंटेन ठेवायचे असेल, तर या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत असे तिचे म्हणणे आहे आहे. नेहाने मराठीत अनेक मालिका सिनेमे केले. त्यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीत रमली. (neha pendase share her look on social media)
तसेच हिंदी मालिका यामध्ये तिने स्वतःचे नाव निर्माण केले. तिच्या करिअरची सुरुवात टॉलीवूड इंडस्ट्रीमधुन झाली होती. त्यानंतर तिने मराठीत पदार्पण केले. नंतर बॉलिवूड आणि आता ती सध्या हिंदी मालिकांमध्ये रमली आहे. तिचा लूक आणि अभिनय क्षमता या जोरावर तिने या तिन्ही क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. आता ती या नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत आहे. म्हणूनच त्यांनी हा मिरर फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे आणि चाहत्यांनीही तिला पसंती दर्शवली आहे.
हेही वाचा :
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘टाईमपास’मधील प्राजुचा तडका, ग्लॅमरस आला समोर
भावाच्या निधनावर महेश बाबूने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला ‘तू नेहमीच माझी…’
नवीन दिवस नवीन फोटो! काळ्या ब्रा आणि स्कर्टमध्ये उर्फी जावेदने लावली पुन्हा इंटरनेटवर आग