टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो ‘मे आय कम इन मॅडम‘ आणि सलमान खानचा रियॅलिटी शो ‘बिग बॉस 12‘ ची स्पर्धक असलेल्या नेहा पेंडसे हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत, जन्मलेल्या नेहाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. यासोबतच तिने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. पण तिच्या करिअरपेक्षाही ती तिचा प्रियकर शार्दुल सिंगसोबतच्या लग्नामुळे चर्चेत राहिली. लग्नासाठी अनेकांनी नेहाला ट्रोल केले. तसेच, घराघरात मॅडमजी म्हणून प्रसिद्ध असलेली नेहा मंगळवारी तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीची प्रेमकहाणी.
पार्टीमध्ये झाली पहिल्यांदा भेट
दोघांची प्रेमकहाणी एका पार्टीपासून सुरू झाली. नेहा आणि शार्दुल पार्टीत एकमेकांशी बोलले, त्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. दरम्यान, शार्दुलला नेहाला फोन करून कामाबद्दल बोलायचे होते. त्या काळात तो ‘प्राइमस’ नावाच्या को-वर्किंग कॉन्सेप्टवर काम करत होता. नेहा आपली ब्रँड ऍम्बेसेडर व्हावी अशी शार्दुलची इच्छा होती. त्यानंतर ती ‘प्राइमस’ची ब्रँड ऍम्बेसेडर बनली. (neha pendse s husband is the father of two daughters this is how the love story of both started)
पहिल्या नजरेत झाले प्रेम
जेव्हा नेहाने शार्दुलला पहिल्यांदा पाहिले, तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढत गेला. दरम्यान तिसर्या भेटीत शार्दुलने नेहाला प्रपोज केले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोन मुलींचा वडील आहे शार्दुल
नेहाने शार्दुलला तिच्या आधीच्या ब्रेकअपशी संबंधित सर्व काही सांगितले. त्याचवेळी शार्दुलने नेहाशी त्याच्या लग्न आणि घटस्फोटाशी संबंधित सत्य सांगितले. शार्दुलला दोन मुली असल्याची माहिती नेहालाही होती. असे असूनही दोघांनी एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
लग्नाआधी होते लिव्ह-इनमध्ये
नेहा आणि शार्दुलने 5 जानेवारी 2020 रोजी थाटामाटात लग्न केले. तर त्याआधी दोघेही ऑगस्ट 2019 पासून लिव्ह-इनमध्ये राहत होते. नेहा आणि शार्दुलने आधीच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी लग्न केले.
हेही वाचा-
–घायाळ करती तुझ्या अदा… शिल्पा शेट्टीचा साडी लूक पाहिलात का?
–‘मी अभिनेता बनलो ते अमिताभ बच्चनमुळे…’, खुद्द रोहित रॉयने केला खुलासा