×

आजही १२ वर्षांपूर्वीच्या चुकीची शिक्षा भोगतोय ‘बिग बॉस’चा विजेता; म्हणाला, ‘लोक मला…’

आशुतोष कौशिक (Ashutosh Kaushik) असा अभिनेता आहे, ज्याने अल्पावधीत आपल्या दमदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र त्याच्या आयुष्यातील एका घटनेने त्याने मिळवलेले यश, प्रतिष्ठा सगळी क्षणात धुळीस मिळाली. इतकेच नव्हे, तर त्या दिवसापासुन आजपर्यंत त्याला कोणतेही काम सुद्धा मिळाले नाही. या चुकीची इतकी मोठी शिक्षा भोगत असलेला आशुतोष स्वतःला खूपच अपराधी समजत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Ashutosh kaushik (@iamashutoshkaushik)

आशुतोष कौशिकने ‘रोडिज’ आणि ‘बिग बॉस २’ असे प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम जिंकून आपल्या नावाचा डंका संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात वाजवला होता. या काळात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे त्याने यशाचे शिखर गाठले होते. मात्र २००९ मध्ये त्याच्याकडून असा एक गुन्हा घडला, ज्यामुळे त्याचे हे सगळे यश, लोकप्रियता सगळेच धुळीस मिळाले. २००९मध्ये आशुतोष दारू पिऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात दोषी आढळला होता. यावेळी त्याचे ड्राइव्हिंग लायसन्ससुद्धा रद्द करण्यात आले होते सोबतच त्याला २५०० रुपयाचा दंडही भरावा लागला होता. इथूनच आशुतोषच्या आयुष्याला ग्रहण लागले.

View this post on Instagram

A post shared by Ashutosh kaushik (@iamashutoshkaushik)

या घटनेबद्दल बोलताना आशुतोष म्हणतो की, “यामुळे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला आहे. मी त्यावेळी २७ वर्षाचा होतो. आयुष्यात मला जे पाहिजे ते सर्वकाही मिळाले. माझे वडील मला सोडून गेले तेव्हा मला मार्ग दाखवणारे कोणी नव्हते. मला काही अनुभव नव्हता. त्यावेळी माझ्याकडून एक चूक झाली, ज्याची शिक्षा मी आजपर्यंत भोगत आहे. मी आज ४२ वर्षाचा झालोय, तरीही मला कोणी काम देत नाही. मला वाईट समजले जाते. माझे लग्न सुद्धा होत नव्हते. मी जेव्हा जेव्हा घरी जातो तेव्हा माझे शेजारी मला विचित्र नजरेने बघतात.”

View this post on Instagram

A post shared by Ashutosh kaushik (@iamashutoshkaushik)

आशुतोषने २०२० मध्ये लग्न केले. त्याची पत्नी अर्पिता बॅंकेत नोकरी करते. तिने सांगितले की इंटरनेटवरील त्या व्हिडिओमुळे माझ्या घरच्यांचे सुद्धा आशुतोष बद्दल वाईट मत तयार झाले होते. आमच्या लग्नाला सुद्धा त्यांचा विरोध होता. मात्र आयुष्यात प्रत्येक जण चुकतो, माझ्या पतीकडुनही एक चूक झाली. मात्र त्याला एवढी मोठी शिक्षा का दिली जातेय.” आशुतोषने या संबधिचे व्हिडिओ इंटरनेटवरुन हटवण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही ते व्हिडिओ तसेच आहेत.

हेही वाचा

Latest Post