देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (दि, 30 डिसेंबर) रोजी यांच्या आई हिराबेन मोदी याचं 100 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी अहमदाबदमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या राहत्या शहरताच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराबेन यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील आणि राजकराणी अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच अभिनेता शाहरुख खान याने देखिल हिराबेन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं मात्र, त्याला याच गोष्टीवरुन जाम ट्रोल केलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांच शुक्रवार (दि, 30 डिसेंबर) रोजी सकाळी पाहाटे निधन झालं आणि त्याच दिवशी 12 वाजेपर्यत त्यांचे अंतिसंस्कार करण्यात आले. शाहरुखने ट्वीट शेअर करत लिहिले की, “पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेनजी यांच्या निधनाबद्दल यांना मनापासून शोक व्यक्त करतोय. माझ्या कुटुंबाच्या प्रार्थना सर तुमच्या पाठीशी आहेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”
Heartfelt condolences to @narendramodi on the loss of his mother Heeraben ji. My family’s prayers are with you sir. May God bless her soul.
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 31, 2022
शाहरुखने सकाळी पाहाटे उठून हे ट्वीट केलं होतं मात्र, नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण अभिनेत्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच (दि, 31 डिसेंबर) रोजी 9 वाजताच्या दरम्याने केलं आहे. त्यामुळे ट्रलर्सने शाहरुखवर निशाना साधला आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
एका युजरने लिहिले की, “एक दिवसांनी आठवण आली, उगाच सहानुभूती दाखवायची गरज नाही, कोणती नशा करतोस तू, त्यांच्या आईचं काल पहाटे साडेतीन वाजता निधन झालं आणि साडेनऊ वाजेपर्यंत अंत्यसंस्कारही झाले होते. पण यांचं आज ट्वीट आलंय, वाटतंय काल नशेत होतास, अशी कृती करतात आणि मग लोक आम्हाला देशविरोधी बोलणारे का म्हणतात? तर दुसऱ्या युजरने लिहिले की, आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या आईचे निधन झाल्याचे तुम्हाला फारच लवकरच कळाले. लाज वाटते तुमच्या सारख्या लोकांची, जिथे तुम्ही राहता त्या देशात काय चालले आहे हे देखील माहित नाही”, अशाप्रकारच्या कमेंटनी शाहरुखने केलेल्या ट्वीटची खिल्ली उडवली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ 5 दिग्गजांनी 2022मध्ये कायमची एक्झिट घेत चाहत्यांना केले पोरके, यादीत लता दीदींचाही समावेश
अनुष्काने विराट आणि लेकीसह थेट दुबईहून शेअर केला फोटो, म्हणाली ‘शेवटचा…’