Friday, July 12, 2024

Video: चाहत्यांची मागणी ऐकून एकता कपूर बनवेल का ‘या’ अभिनेत्रीला ‘नागीण’?

टेलिव्हिजनवरील दीर्घकाळ चाललेली आणि प्रचंड गाजलेली मालिका म्हणुन ‘नागिन’ या मालिकेचा उल्लेख केला जातो. या मालिकेची लोकप्रियता इतकी आहे की, आत्तापर्यंत पाच पर्व या मालिकेने यशस्वीरित्या पार केले आहेत. आता या मालिकेचा ६वा सीझन लवकरच येणार असून, मालिकेची निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) आपल्या चाहत्यांना मालिकेच्या नायिकेसाठी कोणाची निवड करावी, याचा सल्ला मागितला आहे. एकता कपूरचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तर चाहत्यांनीही यासाठी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव सुचवले आहे.

टेलिव्हिजन क्वीन म्हणुन ओळखली जाणारी प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा ‘नागिन’ हा शो प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आजपर्यंत या मालिकेचे ५ सीझन पुर्ण झाले आहेत. आता लवकरच या शोचा सहावा सीझन येणार असुन, एकता कपुरने यासाठी जोरदार तयारी केली आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर करत ‘नागिन ६’साठी मुख्य भूमिकेची निवड झाली नसून, त्यासाठी नाव सांगण्याचा सल्ला नेटकऱ्यांकडे मागितला होता. यावर नेटकऱ्यांनीही ही भरभरून प्रतिसाद देत या लोकप्रिय मालिकेसाठी रूबीना दिलैकचे नाव सुचवले आहे. (netizens wants rubina dilaik for naagin 6 will ekta kapoor listen)

रूबीना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असते. तिचा चाहता वर्गही मोठा असून, ती नेहमी आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामुळेच तिच्या चाहत्यांनी ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेसाठी रूबीनाची निवड केली आहे. एकता कपूरच्या या व्हिडिओच्या आधीपासूनच चाहत्यांनी या भूमिकेसाठी रूबीनाच्या नावाची चर्चा करण्यास सुरुवात केली होती. त्यांची ही मागणी कदाचित एकता कपूरला समजली असेल, म्हणूनच तिने याबाबतचा सल्ला प्रेक्षकांकडे मागितला आहे.

चाहत्यांमध्ये तिच्या नावाची इतकी चर्चा आहे की, त्यांनी तिचे नागिनच्या लूकमधील पोस्टरसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टरमधून या भूमिकेसाठी तिच योग्य आहे, हेच जणू तिच्या चाहत्यांना सांगायचे आहे. दरम्यान रूबीना एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती फॅशन, डान्स आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. ‘छोटी बहू’, ‘शक्ती’ या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. तिच्या या भुमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. म्हणूनच चाहत्यांनी या मालिकेसाठी ती पहिली पसंती दर्शवली आहे. आता एकता कपूर त्यांची ही मागणी किती मनावर घेते, हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा