Friday, July 5, 2024

अरे वाह! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माेठी घोषणा, मुंबईत बनणार फिल्म सिटी

सिनेमा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मायानगरी मुंबईत आणखी एक फिल्मसिटी बनणार आहे. मराठी लोककलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि ठाणे शहरादरम्यान नवीन फिल्मसिटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या फिल्मसिटीचे नाव ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ असे असणार आहे. याची घाेषना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केली आहे. ते नुकतेच एका कार्यक्रमाला गेले होते. त्यादरम्यान त्यांनी ‘दादा साहेब फाळके चित्रनगरी’ योजनेची घोषणा केली.

राज्य सरकारची मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्मसिटी उभारण्याची योजना
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांचा गौरव करण्यात आला. दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या 12,500 व्या शोसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “ठाण्यात अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे चित्रीकरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई ते ठाणे दरम्यान 23 किमी अंतरावर फिल्मसिटी उभारण्याची योजना आखली आहे.”मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, “सध्या सुरू असलेल्या सर्व नाटके आणि नाट्यगृहांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्या सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रशांत दामले यांनी टूरटूर या नाटकातून रंगभूमीवर केले पदार्पण
प्रशांत दामले यांच्या काराकीर्द विषयी बाेलायचे झाले तर, त्यांनी 1983 साली ‘टूरटूर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या त्यामध्ये ‘नकळत दिसले सारे’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘साखर खाल्लेला माणूस’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा समावेश आहे.  (bollywood new film city between mumbai and thane dada saheb phalke chitranagri cm eknath shinde announcement)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निम्रत कौर अहलुवालियाने प्रियंका चौधरीला केली शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हिडिओ

करण सिंग ग्रोव्हरसोबत बिपाशाने दाखवल्या डान्स मूव्ह, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा