सध्या सोशल मीडियावर कलाकारांचे भरमसाठ व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूड आणि मराठीसोबतच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. अशातच आता भोजपुरी सेलिब्रिटी नीलम गिरी आपल्या व्हिडिओमुळे इंटरनेटवर राडा करत आहे. तिचे अनेक व्हिडिओ गाणी इंटरनेटवर ट्रेंड करत आहेत. खूप कमी काळात आपल्या गाण्यांच्या जोरावर तिने भोजपुरी चित्रपटांची ओळख जगापर्यंत पोहोचवली आहे. ती लवकरच अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिने नुकतेच ३ व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यात तिचा कातिलाना अंदाज आणि जबरदस्त एक्सप्रेशन्स दिसत आहेत.
नीलमने नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केले. यामध्ये तिने ऍनिमल प्रिंटेड काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तिची ही अदा पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.
चाहतेही धडाधड कमेंट्स करत तिची प्रशंसा करत आहेत. चाहते तिला चित्रपटात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच ‘तू चित्रपटात केव्हा येशील’, असा प्रश्नही विचारत आहेत.
सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये प्रदीप पांडे चिंटू, काजल राघवानी, नीलम गिरी आणि वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स म्युझिक कंपनीचे मालक रत्नाकर कुमारही दिसत आहेत. रत्नाकर कुमार यांनी या प्रकरणात स्पष्टपणे काहीही वक्तव्य केले नाही, परंतु या तिघांबरोबर वर्ल्डवाईड म्युझिक कंपनी कोणता व्हिडिओ घेऊन येणार आहे, याचा लवकरच खुलासा होईल.
नुकतेच नीलमने वर्ल्डवाईड रेकॉर्ड्ससाठी अनेक गाणी गायली आहेत. या गाण्यांना मिळालेल्या यशानंतर चर्चांना उधाण आले आहे की, रत्नाकर कुमार यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी नीलमसोबत करार केला आहे. सध्या त्यांना या चित्रपटांबाबत कोणताही खुलासा केला नाहीये.
नीलम भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या ‘धनिया हमार नय बाडी़ हो’ गाण्याला मिळालेल्या यशानंतर चर्चेत आली होती. त्यानंतर तिने खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली.
तिच्या ‘नथुनिया के डाली’, ‘जान दुश्मन भईनी जान के’, ‘ए राजा बदनिया टूटता’ या गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स
-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग
-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा