लय भारी! प्रेमाची नवी परिभाषा सांगणारा ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

New Marathi Movie Story of Lagira Release on June 2021


सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वांना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती. याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ चे टिझर मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसादानंतर जी. के. फिल्म्स क्रिएशन निर्मित ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जून २०२१ रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आली आहे. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला रोहित राव नरसिंगे दिग्दर्शित ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.

चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितकीच हटके त्याची कहाणी असेल, यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता बंडू नामदेव मेश्राम आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊननंतर सुरू होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे.

‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतच संपले असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे यांनी केले आहे. तसेच जी. के. फिल्म्स क्रिएशन निर्मित संस्थेअंतर्गत बंडू नामदेव मेश्राम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात रोहित राव नरसिंगे सोबत चैताली चव्हाण आणि ऋतूजा आंद्रे, मोहन जाधव सोमनाथ येलनुरे आणि मराठी चित्रपट सृष्टीमधील चमकता तारा संजय खापरे स्क्रीन शेअर करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या चित्रपटाचा मोशन लोगो लूक प्रदर्शित करण्यात आला होता, या लोगो लूकमध्ये टीमसोबत कलाकारांची माहीती देण्यात आली होती. या लोगो लूकवरुन या चित्रपटात एक जबरदस्त लव्ह स्टोरी आणि कडक गाणे पहायला मिळेल असं वाटतं.

या चित्रपटात रोहित राव नरसिंगे फक्त ऍक्शन सीन नाही, तर तो ऋतूजा आद्रे सोबत रोमान्स देखील करताना दिसणार आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ऋतूजा आद्रे रोहितच्या मिठीत असल्याचे पाहायला मिळतेय, तर चैताली चव्हाण रोहितच्या एकतर्फी प्रेमात असल्याचं दिसतंय. त्याचप्रमाणे संजय खापरे यांचा रोहित राव नरसिंगेवर असलेला राग दिसून येतोय. फोटो शेअर करत चाहता म्हणतेय ‘मी आज खूप उत्सुक आहे कारण रोहित राव नरसिंगेसोबत ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. त्यासोबतच आमच्या टीमला तुम्ही भेटायला तयार आहात ना? अशा आशयाचं कॅप्शन चाहत्याने त्या फोटोला दिले आहे.

या सिनेमात रोहितच्या प्रेयसीचा मृत्यू होतो त्यामुळे त्याची प्रेयसी लांब जाते आणि यात शुभांगी इनामदार हे पात्र त्याच्या सोबती म्हणून राहतं. यानंतर ही मुलगी बिघडलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनवते. अजून कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील.

रोहित राव नरसिंगे या सिनेमात रोहितची मूख्य भूमिका साकारणार आहे, तर ऋतूजा आंद्रे त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. चैताली चव्हाण अक्षयला सुधारणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. संजय खापरे हे या चित्रपटात एक पोलीस अधिकारी, तर सोमनाथ येलनुरे व मोहन जाधव त्याच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजय खापरे, प्रेमा किरण, मिलिंद दास्ताने कास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझे वजन बनले होते राष्ट्रीय मुद्दा’, अभिनेत्री विद्या बालनची वाढत्या वजनावर प्रतिक्रिया, करावा लागला ट्रोलिंगचा सामना

-‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी

-हृदयविकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून ‘हा’ अभिनेता बनलाय माणसातील देवमाणूस


Leave A Reply

Your email address will not be published.