मार्वल स्टुडिओजने सॅम्युअल एल जॅक्सन, कोबी स्मल्डर्स, डॉन चीडल आणि बेन मेंडेलसोहन स्टारर ‘सीक्रेट इनवेजन’ नावाच्या बहुप्रतीक्षित वेबसिरीजचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. किंग्सले बेन-अदिर, ओलिविया कॉलमैन आणि एमिलिया क्लार्क यांना मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स सोबत ओळखले जाणार आहे.
नुकतेच मार्वल स्टुडिओजने ‘सीक्रेट इनवेजन’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यात दाखवले गेले आहे की, सॅम्युअल एल जॅक्सनद्वारा अभिनित निक फ्यूरी शेवटचा जगाला शेप शिफ्टर्स पासून वाचवताना दिसणार आहे. ‘सीक्रेट इनवेजन’च्या ट्रेलरमध्ये दिसते की, कशाप्रकारे तो आकार बदलणाऱ्या शत्रूंशी लढून सर्वांना वाचवत आहे.
नवीन मार्वल सिनेमॅटिक शो असणाऱ्या ‘‘सीक्रेट इनवेजन’ चा ट्रेलर पाहून फॅन्स ही सिरीज पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘‘सीक्रेट इनवेजन’ ही सिरीज जून २१ २०२३ ला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. काइल ब्रँडशीट यांची निर्मिती असणारी ही सिरीज मार्वलच्या या ‘सीक्रेट इनवेजन’ सिरीजमध्ये सहा भाग असणार आहे. या सिरीजचा प्रीमियर इंग्लिश, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये होणार आहे. या सिरीजचा ट्रेलर एकदम भव्य आणि भरवणारा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज