टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चेत असणारे लग्न म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन. मागील बऱ्याच महिन्यांपासून अंकिता आणि विकी यांच्या लग्नाच्या इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे लग्न फॅन्ससाठी आणि मीडियासाठी एक मोठा सोहळाच होता. संगीत, हळद, साखरपुडा, लग्न सर्वच समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाले. या सर्व समारंभाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अंकिताचा लग्न सोहळा, त्यांचे कपडे, विवाहस्थळ, सजावट आदी लहानातलहान गोष्टींपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींपर्यंत सर्वच बाबी मीडियामध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनल्या. तिच्या लग्नात मनोरंजनविश्वातील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
यादरम्यानच आता अंकिता आणि विकी यांचा क्युट, रोमँटिक बेडरूम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघांची कॅमेऱ्याकडे पाठ असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्यांचा रोमॅंटिक मूड आणि एकमेकांवरील प्रेम जाणवत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी दोघांनीही पांढऱ्या रंगाचा नाईट ड्रेस घातला असून, अंकिताच्या ड्रेसवर मिसेस जैन आणि विकीच्या ड्रेसवर मिस्टर जैन असे लिहिले आहे. याशिवाय अंकिताने एक हटके हेयरबॅन्ड देखील घातला आहे. व्हिडिओमध्ये विकी अंकिताला कपाळावर किस करताना दिसत आहे. अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून, अगदी कमी काळात या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आले आहेत.
तत्पूर्वी अंकिताचा गृह्प्रवेशाचा व्हिडिओ देखील तिच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अंकिताने निळ्या रंगाच्या साडीमध्ये गृहप्रवेश केला. अंकिता आणि विकीने गृह्प्रवेशाआधी मीडियासमोर येत अनेक पोज देखील दिल्या. यावेळी निळ्या रंगाच्या साडीमध्ये अंकिता कमाल दिसत होती. यासोबतच गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू, हातात बांगड्या, कपाळावर टिकली, केसांची साधी वेणी घातली होती. तर विकी फॉर्मल ड्रेसमध्ये होता.
अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून केली. नंतर ती कंगना रानौतच्या मनकर्णिकामध्ये देखील महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. अंकिता टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा असून, तिला अमाप फॅन फॉलोविंग आहे.
हेही वाचा :
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार