Friday, April 25, 2025
Home भोजपूरी ‘जा अब पलट के देखब ना’ नीलकमल सिंग आणि काजल राघवानीचे सॅड साँग व्हायरल, गाण्याला मिळतेय चाहत्यांची पसंती

‘जा अब पलट के देखब ना’ नीलकमल सिंग आणि काजल राघवानीचे सॅड साँग व्हायरल, गाण्याला मिळतेय चाहत्यांची पसंती

जपुरी गाण्यांची लोकप्रियता मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रदर्शित झालेली जवळपास सगळीच गाणी आता प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. या भोजपुरी गाण्याची लोकप्रियता सर्वत्र दिसत आहे. भोजपुरी कलाकारांमध्ये एक वेगळीच जादू आहे. आजवर भोजपुरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी प्रकाशित होताना आपण बघितली आहेत. जसे की, प्रेमावर आधारित, उडत्या चालीची. परंतु आता एक वेगळा प्रकार आपल्या चाहत्यांसाठी भोजपुरी संगीत घेऊन आले आहे.

भोजपुरी गायक- अभिनेता नीलकमल सिंग, काजल राघवानी आणि लोकप्रिय गायिका प्रियांका सिंह हे लोकप्रिय त्रिशूल एकत्रित पहिल्यांदाच एक सॅड साँग घेऊन आले आहेत. नीलकमल आणि काजल यांचे नवीन गाणे व्हायरल होत आहे. या गाण्याचे बोल ‘जा अब पलट के देखब ना’ हे आहे. हा म्युझिक व्हिडिओ भोजपुरी वर्ल्डवाईड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झाला आहे. हे सॅड साँग रिलीझ होताच व्हायरल झाले आहे, आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत.

या गाण्यात नीलकमल सिंग आणि काजल राघवानी एकमेकांवर नाराज असलेले दिसत आहेत. असे दिसते की, त्यांच्या नात्यात फट पडली आहे. या गाण्याचे चित्रीकरण एका भव्य ठिकाणी केले गेले आहे. या सॅड साँगचे छायाचित्रही प्रदर्शनापूर्वीच बाहेर आले होते. हे गाणे १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाले आहे, आणि गाण्याने २० लाख व्ह्यूजचा टप्पाही ओलांडला आहे.

वर्ल्डवाईड रेकॉर्डने सादर केलेले हे सॅड साँग नीलकमल सिंग आणि प्रियांका सिंग यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल आशुतोष तिवारी यांनी लिहिले आहेत, तर संगीत राज गाजीपुरी यांनी दिले आहे. त्याचे आयोजक मोहित मौर्य आहे. यात व्हिडिओ दिग्दर्शक रवी पंडित आणि नृत्यदिग्दर्शन राहुल यादव यांनी केले आहेत. दीपक पंडित एडिटर आणि प्रोडक्शन प्रभारी पंकज सोनी आहेत.

नीलकमल सिंगचे चाहते आणि भोजपुरी दर्शक मोठ्या संख्येने हे सॅड साँग पाहत आहेत, ज्यात नीलकमल सिंग आणि काजल राघवानीची जोडी प्रथमच सादर झाली आहे. यात नीलकमल सिंग एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. हे गाणे संगीत रसिकांच्या मनाला स्पर्शून जात आहे. त्यामुळे भोजपुरी गाण्याचा नवीन प्रकार लोकांनी चांगलाच पसंत केलाय, असे म्हणायला हरकत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीच्या नवीन गाण्याची धमाल, मिळाले लाखो हिट्स

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

-पहिल्यांदाच आशियाई सुपरहिरोवर मार्व्हल स्टुडिओने बनवला चित्रपट, तीनच दिवसात टिझरला मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा