बॉलिवूड कलाकारांचे जगभरात करोडो चाहते आहेत. ते कायमच आपल्या आवडत्या कलाकारासारखे दिसण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही जणांनानाच बॉलिवूड कलाकारासारखा चेहरा मिळतो. काही लोक तर त्यांची नक्कल करूनच आपले घर चालवतात. लोक म्हणतात की, आपल्याच सारखे दिसणारे या जगात हुबेहूब ७ लोक असतात. जगामध्ये असे काही लोक आहेत की, जे बॉलिवूड कलाकारांसारखे दिसतात, त्यामुळे त्यांचे फोटो देखील खूप प्रसिद्ध होतात. आता आपण जाणून घेणार आहेत, असे काही प्रसिद्ध चेहरे आणि त्यांची हुबेहूब छबी असणाऱ्या व्यक्तींबद्दल…
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे खूप चाहते आहेत. त्यापैकी एक म्हणजे आंध्रप्रदेशातील गोपी. लोक त्याला ‘आंध्रा अमिताभ’ या नावाने ओळखतात. गोपीचा चेहरा केवळ अमिताभ बच्चन यांच्याशी जुळतो असे नाही तर, त्यांना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल खूप आवड आहे. पण गोपी यांनी चित्रपट निर्मितीविषयीच्या उत्कटतेमुळे बाकी चित्रपटांच्या भूमिकेच्या ऑफर नाकारल्या होत्या.
अक्षय कुमार
काश्मीरच्या माजिद मीर याचा चेहरा, बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याच्याशी मिळता- जुळता आहे. माजिद मीर याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले, आणि ते खूप व्हायरल झाले. यानंतर तो सोशल मीडिया स्टार झाला.
सैफ अली खान
सोशल मीडियावर सैफ अली खानच्या हुबेहूब चेहऱ्याचा शोध लागला आणि त्याचे एक चित्र जोरदार व्हायरल झाले. सैफ अली खानच्या चेहऱ्याने घातलेल्या ड्रेसवर इंडियन ऑईलचे स्टिकर आहे. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, तो एक पेट्रोल पंप कामगार आहे.
जॉन अब्राहम
मुबाशिर मलिक असे जॉन अब्राहमच्या चेहऱ्याचे नाव आहे. मुबाशिर मलिक आर्थिक गुन्हेगारी तज्ञ आणि लेखक आहेत. जॉन अब्राहम आणि मुबाशिर मलिक यांचे एक चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
रणबीर कपूर
श्रीनगरमध्ये राहणारा मॉडेल जुनैद शाह हा रणबीर कपूरची हुबेहूब छबी आहे. दोघांचा चेहरा इतका मिळतो की, आपली फसवणूक होईल. जुनैद शाह याचे २०२० मध्ये जुलै महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
ऋतिक रोशन
हरमन बावेजाला हृतिक रोशनची हुबेहूब छबी म्हणतात. तथापि, हरमन बावेजाने ‘लव्ह स्टोरी २०५०’, ‘ढिशकियूं’, ‘व्हॉट्स योर राशि’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. ऋतिक रोशनचा आणि त्याचा चेहरा खूपच मिळता जुळता आहे.
ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चनची हुबेहूब छबी ही चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. हिंदी आणि दक्षिण सिनेमाचा परिचित चेहरा स्नेहा उलाल हिला ऐश्वर्या राय बच्चन यांची ट्रू कॉपी म्हणतात.
स्नेहा उलालने सलमान खानच्या ‘लकी’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग
-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप