Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड प्रतीक्षा संपली! ‘बेबो’ने शेअर केला लहान मुलाचा पहिला फोटो, तैमूरच्या कुशीत झळकला ‘छोटा नवाब’

प्रतीक्षा संपली! ‘बेबो’ने शेअर केला लहान मुलाचा पहिला फोटो, तैमूरच्या कुशीत झळकला ‘छोटा नवाब’

बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान नुकतीच परत एकदा आई झाली आहे. करीना कपूर खानने दुसऱ्यांदाही मुलालाच जन्म दिला आहे. करीना कपूरने अद्याप दुसर्‍या मुलाचा फोटो चाहत्यांसमोर सादर केला नव्हता. पण आता प्रतीक्षा संपली आहे, अभिनेत्रीने आज आपल्या चाहत्यांसाठी आपल्या छोट्या नवाबाचा म्हणजेच छोट्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. मातृदिनानिमित्त, करीनाने चाहत्यांसाठी दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला आहे.

करीनाच्या लहान मुलाचा जन्म, फेब्रुवारीमध्ये झाला होता, पण येवढे दिवस करीनाने आपल्या छोट्या मुलाला मीडियाच्या नजरेपासून पूर्णपणे दूर ठेवले होते.

खास दिवशी मुलाचा सुंदर फोटो, चाहत्यांना पाहण्यासाठी केला शेअर

करीनाच्या दुसर्‍या मुलाचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. मातृदिनानिमित्त अभिनेत्रीने आपल्या मुलाची सर्वांना ओळख करून दिली आहे.

करीनाने शेअर केलेल्या फोटोत, मोठा भाऊ तैमूरने लहान भावाला आपल्या मांडीवर घेतले आहे. फोटोमध्ये तैमूर कॅमेराकडे पाहताना हसताना दिसत आहे, तर करीनाचा लहान मुलाच्या चेहऱ्यावर हात आहे. या फोटोमध्येही करीनाच्या मुलाचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसत नाहीये.

फोटो शेअर करताना करीना कपूरने लिहिले आहे की, “आज संपूर्ण जग आशेवर आहे, आणि हे दोघे मला आशा देत आहेत. चांगल्या उद्याची आशा आहे, तिथल्या सर्वांना सुंदर मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… विश्वास ठेवा…”

करीना कपूरची ही पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अभिनेत्रीच्या मुलाचा पहिला फोटो पाहिल्यानंतर, चाहते वेडे झाले आहेत. करीनाच्या पोस्टवर चाहत्यांनीही विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

करीना कपूर खानने, केवळ एका महिन्यासाठी प्रसूती रजा घेतली होती. मुलाच्या जन्मानंतर महिन्याभरातच, करीनाने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊनमुळे ती अजूनही घरीच आहे. तसेच ती सर्वांना घरी आणि सुरक्षित राहण्यास सांगत आहे. करीना शेवटची ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

हे देखील वाचा