Saturday, January 28, 2023

Video: पोल डान्स करत, निया शर्माने दाखवलं तिचं आकर्षक फिगर; पाहून चाहते घायाळ

निया शर्मा (Nia Sharma) भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात हॉट सेलिब्रिटींपैकी एक आहे. अभिनेत्रीचा ‘फुंक ले’ हा नवीन म्युझिक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. तसेच, तिच्या सिझलिंग आणि किलर डान्स मूव्ह्स प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. त्याचवेळी नियाने तिचा अगदी लेटेस्ट अवतार दाखवून नेटकऱ्यांना भुरळून टाकले आहे. नियाने पहिल्यांदाच तिचा पोल डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

लिहिले मजेदार कॅप्शन
निया शर्मा आजकाल सतत हिट म्युझिक व्हिडिओ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती आता तिच्या लेटेस्ट इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये पोल डान्स शिकत आहे. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची बॉडी पावर तपासत आहे. हा व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शन दिले आहे की, “माझी हाडे तुटत आहेत असे कधीच वाटले नाही. ही प्रेरणा खूप चांगली आहे.”

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. युजर्स तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तर काही युजर्स अभिनेत्रीला पुन्हा ट्रोल करत आहेत.

आपली समस्या केली होती उघड
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत निया शर्माने कबूल केले होते की, तिला काम मिळवण्यासाठी भीक मागण्यापासून ते रडावेही लागले होते. ती म्हणाले, “तुम्ही तुमचे काम करता आणि तुमच्या मोबदल्यासाठी भीकही मागावे लागते. मी यातून गेले आणि लढले आहे. मी स्टुडिओबाहेर उभी असायचे आणि म्हणायचे, जोपर्यंत माझा पेमेंट होत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही.”

नियाने ‘काली – एक अग्निपरीक्षा’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘जमाई राजा’ सारख्या अनेक मालिकामध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा