Wednesday, July 3, 2024

मोनोकिनीमध्ये बीचवर स्टंट करणे पडले निया शर्माला महाग, मग जे झाले त्याचा झाला व्हिडिओ व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. निया सतत या ना त्या कारणामुळे लाइमलाईट्मधे येत असते. निया तिच्या कामामुळे कमी आणि बोल्ड फोटो, वक्तव्यांमुळे जास्त गाजते. सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. नेहमीच ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या देखील ती तिच्या एका व्हिडिओमुळेच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया शर्माने नुकताच तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जी तिच्यासोबत घडले ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओमध्ये निया पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तुफान मस्ती करत असून, तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी देखील आहेत. या व्हिडिओमध्ये निया समुद्र किनारी असून पाण्यामध्ये मजा मस्ती करत आहे. या व्हिडिओमध्ये ती पाण्यात कोलांटी उडी मारण्याचा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती जोरात पडते. पुन्हा ती कोलांटी उडी मारायचा प्रयत्न करते आणि पुन्हा पडते. परफेक्ट कोलांटी उडी मारण्यासाठी ती अनेकदा प्रयत्न करते मात्र अपयशी ठरते. तिच्या या व्हिडिओवर तिच्या फॅन्ससोबतच अनेकांनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी निया शर्मा ही मूळची दिल्लीची असून, तिचा जन्म १७ सप्टेंबर १९९० साली झाला. खूप कमी लोकांना माहित असेल की. तिचे मूळ नाव निया नाही तर नेहा शर्मा आहे. २०१० साली नियाने तिच्या करियरची सुरुवात केली. तिने स्टार प्लसच्या ‘काली- एक अग्निपरीक्षा’ मालिकेत अनु ही भूमिका साकारली होती. पुढे तिला ‘एक हजारों में मेरी बहना है’ मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावां’, ‘नागिन’ आदी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ती खतरो के खिलाडीमध्ये देखील दिसली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा