Monday, May 27, 2024

प्रियांकाचा नवरा निक जोनस ‘या’ गंभीर आजाराने आहे ग्रस्त; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

सर्व सामान्य व्यक्ती असो किंवा मोठा कलाकार, आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला आजारापण जडतंच. अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) आणि निक जोनस(Nick Jonas) हे सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होताना दिसतात. नुकताचं निक जोनसने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे सध्या त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

निक जोनस एक फेमस अमेरिकन सिंगर आहे त्याचसोबत तो प्रियांका चोप्राचा नवरा म्हणूनही आपण त्याला ओळखतो. तो एक सिंगर म्हणून प्रसिद्ध आहेच पण प्रियांका चोप्रासोबत लग्न झाल्यानंतर तो जास्तच चर्चेत आला आहे. इंडस्ट्रीमधील बेस्ट कपल पैकी हे एक आहेत. निक आणि प्रियांकाच्या फॅन्ससाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. जे ऐकून चाहत्यांना धक्का बसलाय. प्रियांका चोप्राचा नवरा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. निकला वयाच्या तेराव्या वर्षापासून मधूमेहाचा आजार आहे. अनेकांना हे कळताच आश्चर्य वाटेल पण हे खरंय. कमी वयातच या अभिनेत्याला आजारामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत निकने स्वत: त्याच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

 

View this post on Instagram

 

 

निक जोनस वयाच्या १३ वर्षांपासून टाईप 1 प्रकारातील डायबिटीज सुरु झाली होती. नुकतेच स्वतः निकने त्याच्या डायबिटीज आणि त्याच्या लक्षणांविषयी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होत. त्याच्या डायबिटिजविषयी अनेक महतवाच्या माहिती त्याने या व्हिडिओमधून दिली आणि हा व्हिडीओ जास्तीत जस्ट शेअर करण्याचं आवाहन आपल्या फॅन्सना केलं. अचानक वजन कमी होणे, सतत तहान लागणे, सतत लघवीला जाणे, चिडचिडेपणा वाढणे हे सर्व लक्षणे निकने अनुभवलेली आहे.

सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत. आणि खूप महत्वाची बातमी शेअर केल्याबद्दल त्याचे आभारसुद्धा मानत आहेत. जवळपास ९ मिलियन लोकांनी पहिला आहे आणि हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

आजारपणात प्रियंकाने दिली निकची साथ
निक डायबिटीज या विषयावर याआधी एका प्रोग्रामदरम्यान बोलला होता. त्याच्या आजारपणात प्रियंकाने त्याला साथ दिली असेही तो म्हणाला. ‘एके काळी या आजाराने मी पूर्णपणे खचून गेलो होतो, मात्र आता मी त्यातून सावरलो आहे. आणि इतरांनाही यातून बाहेर पडायला प्रोत्साहन देतोय.’ असे निकने त्याच्या एका मुलाखतीत देखील सांगितले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपिलने अजय देवगणला त्याच्या लग्नाशी संबंधित विचारला प्रश्न, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर

धक्कदायक! र‍िदा इस्‍फहानीच्या हाेणाऱ्या नवऱ्यानेच खासगी व्हिडिओ केला लीक

हे देखील वाचा