Sunday, May 19, 2024

कपिलने अजय देवगणला त्याच्या लग्नाशी संबंधित विचारला प्रश्न, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता अजय देवगण लवकरच ‘दृश्यम 2‘ या चित्रपटात दिसणार आहे. 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट हिट व्हावा यासाठी अजय सध्या ‘दृश्यम 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच तो कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कपिल शर्मासोबत अजय आणि तब्बूही दिसत आहेत. या मजेशीर व्हिडिओमध्ये अजय कपिल शर्माला त्याच्या विनोदाने मागे टाकताना दिसत आहे.

हा मजेशीर व्हिडिओ कपिल शर्मा (kapil sharma) याने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कपिल शर्मा तब्बूचे स्वागत करतो आणि तिला मिठी मारतो, तेव्हा अचानक अजय देवगण (ajay devgn) तिथे पोहोचतो आणि कपिलला विचारतो की, “12 डिसेंबरला काय झाले?” यावर उत्तर देताना कपिल गमतीने म्हणतो की, “सकाळ झाली, दुपार झाली आणि मग रात्र झाली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

त्यानंतर कपिलला अडवत अजय म्हणतो की, “तुझे लग्नही झाले आहे.” हे ऐकून उपस्थित प्रेक्षक पाेट धरुन हासायला लागतात. यानंतर कपिल शर्मा अजयला विचारतो की,”24 फेब्रुवारीला काय घडले होते ते आठवते का?” या प्रश्नाचे उत्तर देताना अजय म्हणतो की, “मी सत्संग करत होतो.” यावर कपिल म्हणतो की, “भाऊ तुझे लग्न होते.” म्हणूनच अजय देवगण म्हणतो की, “एकच गोष्ट आहे, लग्नानंतर प्रत्येकजण सत्संग करतो.”

‘दृश्यम 2’चे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘उजदा चमन’ नावाचा चित्रपटही बनवला आहे. या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबत अक्षय खन्नाही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अक्षय आणि अजयच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली. (bollywood actor ajay devgn tabu reached on the kapil sharma show to promote drishyam)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर अडकली लाेकांच्या गर्दीत, रागाने झाली लाल

जया बच्चन अन् महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट चर्चेत, राजकारणातील मोठ्या मंत्र्याविरुद्ध केली तक्रार

हे देखील वाचा