भारतातच नाही तर परदेशातही तुफान लोकप्रिय असणारे कपल म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. प्रियांका तिचा नवरा निक हे दोघं इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहेत. दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या दोघांचे संपूर्ण जगात लाखो फॅन्स आहेत. ‘देसी गर्ल’ प्रियांका आणि निक या दोघांची अतिशय लाघवी जोडी नेहमीच फॅन्सच्या आकर्षणात असते. या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची वाट फॅन्स बघतच असतात.
नुकतीच निक जोनासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा आणि प्रियांकाचा एक रोमँटिक असा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने २०१९ सालचा कान्स फिल्म फेस्टिव्हलचा असून अतिशय सुंदर आहे. या फोटोमध्ये निक अतिशय स्टायलिश आणि प्रियांका ऑरेंज कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ” #throwbackthursday Cannes 2019.#cannes.”
निकने ही पोस्ट केल्या केल्या लगेच सर्वात पहिली रिऍक्शन त्यावर त्याची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या प्रियांकाने कमेंट केली आहे. तिने तिच्या कमेंटमध्ये शब्दांचा आधार न घेता फक्त ईमोजी वापरून तिच्या भावना व्यक्त केल्या आहे. तिने या पोस्टवर एक हार्ट आणि स्माईल विथ लव्ह ईमोजी कमेंट केली आहे. प्रियांका आणि निक अनेक कार्यक्रमांना आणि पार्ट्यांना एकत्र जाताना आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.
प्रियांका चोप्राने २०१८ साली अमेरिकन गायक असलेल्या निक जोनाससोबत लग्न केले. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती शेवटची ‘द व्हाइट टाइगर’ सिनेमात राजकुमार रावसोबत दिसली होती. अभिनयासोबतच प्रियांकाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. त्याचे नाव ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत तिने अनेक हिंदी मराठी चित्रपटांची निर्माती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज
-‘ब्युटीफुल नारी इन पिंक सारी!’ मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या साडी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती
-प्रेग्नन्सीवेळी केलेल्या फोटोशूट दरम्यान करीना कपूर झाली होती बेशुद्ध, म्हणाली, ‘मला या काळात खूप…’