×

भोजपुरी इंडस्ट्रीमधील कपल निधी झा आणि यश कुमार यांनी केली लग्नाची घोषणा, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

सध्या मनोरंजनविश्वात एका मागोमाग एक कलाकार विवाहबंधात अडकताना दिसत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बिग बॅश वेडिंगनंतर अनेक लहान मोठे कलाकार लग्न करत नवीन जीवनाची सुरुवात करत आहे. आता पुन्हा एकदा मनोरंजनाविश्वात सनईचे सूर गाजणार आहे. भोजपुरी इंडस्ट्रीला लोकप्रिय कपल लवकरच लग्न करणार आहे.

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या निधी झाने नुकतीच तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. निधीने २५ एप्रिल रोजी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ती अभिनेता यशासोबत लग्न बंधनात अडकनर असल्याचे जाहीर केले आहे. निधी आणि यश हे भोजपुरी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जाते. निधीचे हे पहिले लग्न असून, यशाचे दुसरे लग्न असणार आहे. यशने त्याचे पहिले लग्न प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अंजना सिंगसोबत केले होते.

View this post on Instagram

A post shared by Nidhi Jha (@nidhijha05)

आता पुन्हा एकदा यश बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला असून, निधी देखील या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहे. आपल्या लग्नाची तारीख जाहीर करताना निधीने तिच्या इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये तिचा आणि यशचा साखरपुड्याचा रोमॅंटिक फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “०२.०५.२०२२.” तर तिने शेअर केलेल्या फोटोवर लिहिले आहे की, “यश आणि निधी यांच्या लग्नाची तारीख लक्षात ठेवा ०२.०५.२०२२.”

निधीची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. तिच्या या पोस्टवर फॅन्स, कलाकार सर्वच भरभरून कमेंट्स करत त्या दोघांना त्यांच्या या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. यासोबतच अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत त्यांच्या लग्नाचे स्थळ देखील विचारले आहे.

निधी झा आणि यश कुमार यांनी याचवर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. निधी आणि यशने जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित साखरपुडा केला ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आणि रंजक आहे. यशने अभिनेत्री अंजना सिंगसोबत लग्न केले होते, या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post