×

नोरा फतेहीच्या आईने शोधलंय तिला लग्नासाठी स्थळ, नोरा देईल का लग्नाला होकार?

हिंदी सिने जगतात नोरा फतेहीच्या (Nora Fatehi)  डान्सची आणि  बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. अगदी कमी काळात तिने आपल्या बहारदार नृत्य कौशल्याने बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर नोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणाने चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यावर तिचे चाहते सुंदर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. सध्या नोराचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिचा धमाकेदार डान्स नव्हेतर मारामारीचीच झलक  पाहायला मिळत आहे. 

सुपर डान्सर नोरा फतेही ही हिंदी सिनेजगतातील एक लोकप्रिय  चेहरा म्हणून नेहमीच चर्चेत असते. तिच्या डान्सची, बोल्ड फोटोंची तरुणाईमध्ये नेहमीच चर्चा पाहायला मिळते. सध्या नोराचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्याची तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. नोराचा एक जुना व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही एक मजेदार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते.

एकीकडे नोरा तिच्या स्टाईलमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे त्याचवेळी ती तिच्या आईची भूमिका साकारत आहे. जी वारंवार नोरावर लग्नासाठी दबाव टाकताना दिसत आहे. त्याचबरोबर तिने अनेक मुलांचे फोटोही आणले आहेत. हे पाहून नोरा तोंड फिरवते आणि नकार देऊ लागते. तिचे हे उत्तर ऐकूण थोड्या वेळाने आई तिच्यावर चप्पलचा वर्षाव करते. नोराच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांकडूनही मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना एका एका युजरने “आईचे सर्वात सहज उपलब्ध असलेले शस्त्र चप्पल आहे, जे इतरवेळेस उपलब्ध नसते, परंतु भांडणाच्या वेळी लगेच सापडते” असा मजेशीर कमेंन्ट केली आहे. तर आणखी एका चाहतीने यावर प्रतिक्रिया देताना नोराला “तु कपिल शर्माच्या कार्यक्रमात जा जिथे तुझी कॉमेडी बघून लोक मालिका विसरतील” असाही सल्ला दिला आहे. सध्या नोराच्या या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

Latest Post