Wednesday, December 3, 2025
Home मराठी ‘तुझं तोंड मी खलबत्याने ठेचेल’, बिग बॉसच्या घरात निक्कीचा अंकीतावर हल्ला !

‘तुझं तोंड मी खलबत्याने ठेचेल’, बिग बॉसच्या घरात निक्कीचा अंकीतावर हल्ला !

बिग बॉस मराठीचा नवीन सिझन सुरु झाला आहे. सोशल मिडीयावर प्रसिद्ध असणारे अनेकजण यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झाले आहेत. सध्या एका व्यक्तीने चर्चेला उधाण आणलय. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून निक्की तांबोळी हि आहे. निक्कीने अनेकांच्या नाकी नऊ आणले आहेत. आता निक्कीने अंकिता वालावलकर हिला अगदी रडवलं आहे. बीग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला मिळतंय कि निक्की आणि अंकिता एका टास्कमध्ये एकत्र सहभागी आहेत.

नॉमिनेशनची तोफ असं नाव असलेल्या या टास्क मध्ये अंकिता निक्कीला म्हणते, मला तुझ्यासोबत काहीही खेळायचं नाहीये तू माझ्यापासून दूर राहा. त्यावर निक्की म्हणते, तू दूर जा … माझी मर्जी … तुला मला उचलून घ्यायचंच नाहीये. पुढे अंकिता तिला उचलून घेत म्हणते, तुला आता मी असं उचलून घेऊ का? अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती तिला म्हणते, माझे हात बघायचे आहेत का तुला कसे चालतात… परत जर हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्याने ठेचेल. असं म्हटल्यावर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.

ज्यावेळी हा प्रोमो व्हायरल झाला त्यावेळी अंकिताचे चाहते भडकले. अंकिता रडतेस कशाला वाजव निकिताच्या एक सणसणीत कानाखाली, निक्की आता डोक्यात जातेय, अंकिता ताई निक्कीला आता मालवणी इंगा दाखवाच, अंकिता ताई आता रडायचं नाही लढायचं. निक्की ताई आता बस करा. अशा अनेक कमेंट्स करत लोकांनी निक्कीवर राग दाखवला आणि अंकिताला सपोर्ट दाखवला. आता बिग बॉसच्या घरात अजून कोणत्या गमतीजमती होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

“३५ वर्षे सत्तेत असलेला आमदार मी पाडला”. छोट्या नेत्याचा बिग बॉस मध्ये मोठा दावा
जरीन खान घर सोडण्यास घाबरत होती, कतरिनाशी तुलना केल्याने झाले असे परिणाम

हे देखील वाचा