‘बिग बॉस १४‘ फेम आणि दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तांबोळी नेहमीच आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत असते. ती नेहमीच एकापेक्षा एक ग्लॅमरस आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवते. ‘बिग बॉस’मध्ये झळकण्यापूर्वी निक्कीला कुणी ओळखत नसेलही, पण आता तिला परिचयाची गरजही नाही. प्रत्येकजण तिच्या अदावर फिदा होतो. आघाडीच्या अभिनेत्रींसोबतच निक्कीदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटोंना जबरदस्त पसंती मिळत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओत तिचा हॉटनेस पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
निक्कीने (Nikki Tamboli) शेअर केलेल्या या व्हिडिओत ती ट्रान्सपरेंट गाऊनमध्ये आपला परफेक्ट फिगर प्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या अदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडिओ निक्कीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत अभिनेत्रीने फिक्कट निळ्या रंगाचा ट्रान्सपरेंट गाऊन परिधान केला आहे. ड्रेससोबतच तिने हेवी मेकअप केला आहे. तसेच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिस आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे वाजत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.