निक्की तांबोळीच्या बोल्ड अदांनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, पाहून तुमचीही उडेल झोप


छोट्या पडद्यावरील मालिका आणि शोमध्ये काम करून अभिनेत्री घराघरात पोहोचतात. तसेच चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करतात. मात्र, याच अभिनेत्रींचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर असतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी होय. सोशल मीडियावर कशाप्रकारे झळकायचं, हे चांगलंच माहितीये. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आताही असेच काहीसे झाले आहे. निक्कीने सोशल मीडियावर ब्रालेटसोबत साडी नेसून असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहते दीवाने झाले आहेत.

साडीत दाखवल्या बोल्ड अदा
या व्हिडिओत निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) निळ्या आणि चंदेरी रंगाची शिमरी साडी वेगळ्याच स्टाईलमध्ये नेसली आहे. तसेच बॅकग्राऊंडला ‘नाचे मधुबन में राधिका’ हे गाणे वाजत आहे, ज्यावर निक्की आपले शरीर हलवताना दिसत आहे. व्हिडिओतील निक्कीच्या अदा कोणालाही घायाळ करण्यास पुरेशा आहेत.

ब्रालेटमध्ये दाखवली डीप नेक
या व्हिडिओमध्ये निक्कीने निळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. यासोबतच तिची डीप नेक व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मोठे कानातले घातले आहेत.

आपल्या ठुमक्यांनी करतेय घायाळ
या व्हिडिओमध्ये निक्की संगीतावर जबरदस्त डान्स करत आहे. तिच्या या डान्सवर चाहत्यांची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओ केला शेअर
निक्कीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. निकीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून चाहते सातत्याने अभिनेत्रीच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

‘बिग बॉस १४’मध्येही झळकलीय अभिनेत्री
निक्की तांबोळीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिला खरी ओळख ही ‘बिग बॉस १४’मधून मिळाली. या पर्वामध्ये, निक्की केवळ तिच्या ऍटिट्यूडमुळे प्रसिद्धीझोतात आली नाही, तर तिच्या चाहत्यांनाही तिच्या गेम प्लॅनने वेड लावले. तिला या शोची ट्रॉफी जिंकता आली नसली, तरीही ती सेकंड रनर अप नक्कीच होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!