भावाच्या निधनानंतर निक्की तांबोळीला सतावतेय आई- वडिलांची चिंता; लिहिली भावनिक पोस्ट

nikki tamboli worried about her parents after brother death wrote emotional post


‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीचा भाऊ जतीन तांबोळी, याचे नुकतेच कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्याच्या मृत्यूमुळे निक्कीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आता तिला तिच्या पालकांबद्दल चिंता सतावत आहे. नुकताच निक्कीने सोशल मीडियावर तिच्या आई-वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने तिची चिंताही व्यक्त केली आहे.

निक्कीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “देव त्यांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो. मला तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू पाहायचे आहे.” तिने पुढे लिहिले की, “माझ्या वडिलांसाठी ही वेळ खूप कठीण आहे. नुकतेच त्यांनी त्यांच्या आईला गमावले आहे. देव त्यांना हे दु: ख सहन करण्याची शक्ती देवो.”

यापूर्वी निक्कीने तिच्या भावासाठीही एक पोस्ट लिहिली होती. तिने आपल्या भावाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या आणि म्हणाली की, “त्याने आम्हा सर्वांना सोडून असे नव्हते जायला पाहिजे.” बर्‍याच टीव्ही कलाकारांनी निक्कीच्या भावाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या टीव्ही कलाकारांच्या यादीमध्ये अभिनव शुक्ला, अली गोनी, राहुल महाजन, मनु पंजाबी आणि जॅस्मीन भसीन यांची नावे आहेत.

भावासाठी लिहिला भावनिक संदेश
निक्की तांबोळीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ”आम्हाला ठाऊक नव्हते की, आज सकाळी देव तुला बोलवणार आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम केले आहे. तू इथून एकटा गेला नाहीस, तर आमचा काही भागही तुमच्याबरोबर गेला आहे. आपली कौटुंबिक साखळी तुटलेली आहे.” तिने पुढे लिहिले की, “तुला नेहमीच खूप प्रेम केले आहे आणि आम्ही तुला कधीही विसरू शकणार नाहीत. तुझ्या आत्म्याला शांती मिळावी. मला तुझी आठवण येते दादा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.