Friday, October 17, 2025
Home मराठी ‘बाहुबलीचा सेम आवाज भाऊ काढतो’ म्हणत, निलेश साबळेने केला ‘चला हवा येऊ द्या’चा आगामी प्रोमो शेअर

‘बाहुबलीचा सेम आवाज भाऊ काढतो’ म्हणत, निलेश साबळेने केला ‘चला हवा येऊ द्या’चा आगामी प्रोमो शेअर

विनोद हा आपल्या मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. अनेक कलाकार त्यांच्या जबरदस्त कॉमेडी टाईमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. ‘चला हवा येऊ द्या‘ हा मराठी टेलिव्हिजनवरील विनोदी कार्यक्रम आहेत. या शोमध्ये आपल्याला अनेक विनोदाचे पैलू पाहायला मिळतात. यामध्ये एका पेक्षा एक अव्वल विनोदवीर आहेत. जे आपल्या विनोदाने नेहमीच सगळयांना खळखळून हसवत असतात.

भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे या कलाकारांनी नेहमीच आपल्याला हसवले आहे. यासोबत या शोमध्ये अनेक नवीन कलाकार आले आहेत. त्यांनी देखील अगदी कमी कालावधीत सगळ्यांना आपलेसे केले आहे. अशातच या शोच्या आगामी भागाची एक झलक निलेश साबळेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दाखवली आहे.

निलेश साबळेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियाव शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातील कलाकार दिसत आहे. ज्यात हिम्मतवाला हा चित्रपट रिक्रिएट करण्यात आला आहे. ज्यात ‘तेरे नाम’ फेम अभिनतेरी भूमिका चावला देखील आलेली दिसत आहे. भाऊ कदम तिला सांगताना दिसत आहे की, तो तिचा किती मोठा चाहता आहे. तसेच तो हे देखील सांगतो की, त्याने ‘तेरे नाम’ हा चित्रपट पाहून सलमान खान सारखी हेअर स्टाईल केली होती. तसेच नंतर ते थुकरटवाडीतील ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट दाखवतात. त्यानंतर सगळेच खळखळून हसतात.

निलेश साबळेने ही पोस्ट करून कॅप्शन दिले आहे की, “बाहुबलीचा सेम आवाज भाऊ काढतो. नक्की पाहा
‘हिम्मतवाला’ या सोमवार आणि मंगळवार रात्री ९ .३० वाजता ‘चला हवा येऊ द्या’ फक्त आपल्या झी मराठीवर” त्यांचा हा प्रोमो चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच सगळेजण हा एपिसोड बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा