Friday, April 19, 2024

राज कपूरपासून ते धर्मेंद्रपर्यंत दिग्गज अभिनेते तरसायचे ‘या’ अभिनेत्रीसोबत काम करायला, एका चुकीमुळे भोगावी लागली मोठी शिक्षा

‘बरसात’, ‘दीदार’, ‘दाग’, ‘उडणखटोला’, ‘मेरे मेहबूब’, ‘पूजा के फूल’, ‘आकाशद्वीप’, ‘लव अँड गॉड’ या ५० आणि ६०च्या दशकात काळात गाजलेल्या चित्रपटांमधून अभिनेत्री ‘निम्मी’ने आपली विशिष्ट अशी ओळख निर्माण केली. तसेच देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार यांच्यासारख्या आघाडीच्या कलाकारांबरोबर एकापेक्षा एक सरस चित्रपट तिने केले. सोबतच मीना कुमारी, मधुबाला, गीता बाली या अभिनेत्रींच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मते जिंकणाऱ्या निम्मीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर…

वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी ‘बरसात’ चित्रपटात ग्रामीण मुलीच्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी निम्मी एक उत्तम अभिनेत्री होती. तिचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ ला आग्रा मध्ये झाला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झालेली निम्मी हिला पहिला ब्रेक दिला तो राज कपूर यांनी. तसेच त्यांनीच नवाब बानो वरून तिचे नाव निम्मी असे ठेवले. तेव्हापासून ती याच नावाने ओळखली जायची. त्याकाळातील तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जायचे.

तब्बल १६ वर्षे काम करणारी निम्मी ही सन १९४९ ते १९६५ मध्ये चित्रपटात सक्रिय होती. एक दिवस काम करत असताना तिची भेट लेखक अली रझा यांच्यासोबत झाली. तिच्या प्रत्येक सरावात ते तिला मदत करायचे आणि नंतर त्यांनीच तिच्यात शायरीची आवड निर्माण केली होती. हळू हळू त्यांच्यात मैत्री झाली आणि ही मैत्री घट्ट होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. नंतर त्या दोघांनी लग्न करून तिने चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला.

त्याकाळात निम्मीसोबत काम करायला अनेक जाणते चेहरे तिच्या मागेपुढे असायचे ज्यात दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. खुद्द राज कपूर तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होते. परंतु तिने केलेल्या एका चुकीची शिक्षा तिला आयुष्यभर भोगायला लागली आणि तिच्या अभिनयाची कारकीर्द संपुष्टात आली, असे म्हणणे वागगे ठरणार नाही.

सन १९६३ मध्ये ज्या वेळी ‘महबूब’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार होते त्यावेळी तिने या चित्रपटातील प्रमुख भूमिका नाकारली. या चित्रपटाचे दिग्दर्शक हरनाम सिंग रावेल यांना निम्मीला प्रमुख भूमिकेसाठी निवडायचे होते. तसेच बिना राय हिला राजेंद्र कुमारच्या बहिणीची भूमिका साकारायला द्यायची होती. परंतु तिला वाटले की बहिणीची भूमिका ही प्रमुख भूमिकेपेक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे तिने प्रमुख भूमिका साकारायला विरोध केला. त्यामुळे तिला आगामी चित्रपटात या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला.

तिच्या त्या एका पात्राच्या निर्णयामुळे आपली संपूर्ण कारकीर्द तिने स्वत:च्या एका चुकीमुळे संपविली. याचा परिणाम असा झाला की कोणताही दिग्दर्शक किंवा निर्माता यांनी आपल्या तिला चित्रपटात घेतले नाही.

सन १९५९-६०च्या दशकात चंदेरी दुनियेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे सन २०२०मध्ये मुंबईतील एक रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला सरला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. संध्याकाळच्या दरम्याम तिची प्राणज्योत मालवली, तेव्हा ती ८८ वर्षांची होती. भायखळ्याच्या रेहमताबाद दफनभूमीत तिला दफन करण्यात आले होते, त्यावेळी तेथे फारच थोडे निकटवर्तीय उपस्थित होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रेग्नंट वाटतीये!’ लग्नांनंतर प्रथमच समोर आलेल्या दियाला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

हे देखील वाचा