‘प्रेग्नंट वाटतीये!’ लग्नांनंतर प्रथमच समोर आलेल्या दियाला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; पाहा व्हायरल व्हिडिओ


बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने नुकताच उद्योजक वैभव रेखीसोबत लगीनगाठ बांधली. हे तिचे दुसरे लग्न होते. लग्नानंतर अवघ्या चार दिवसातच ती आपल्या कामावर रुजू झाली. यादरम्यान शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिच्या लूकची सर्वात जास्त सुरू झाली. यादरम्यानचा दिया मिर्झाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नानंतर दिया प्रथमच सर्वांसमोर आली होती. निळा कुर्ता आणि पांढरा प्लाझो परिधान केलेली दिया अगदी साधी दिसत होती. तिला पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विविध प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. त्यातच दिया गर्भवती आहे का?, या चर्चेनेही जोराचा वेग धरला. काही लोक तिची थट्टा करुन गरोदरपणाच्या बातम्यांचा प्रसारही करत आहेत.

लग्नानंतर या नव्या वधूचे हे साधेे रूप प्रेक्षकांसाठी जरा विचित्र होते, त्यामुळे लोक ते पचवू शकले नाहीत. हे पाहून काही लोकांना दिया मिर्झा चक्क गर्भवती असल्याचे वाटू लागले. मात्र, अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नुकतेच, दिया आणि वैभव रेखा यांचे 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न झाले. त्यांचे लग्न खासगी ठेवले गेले होते, जे साध्या पद्धतीने पूर्ण झाले. दियाच्या लग्नात महिला पंडित चर्चेचा विषय बनली होती. दियाने एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, तिचे लग्न एका पंडित महिलेने केले आहे. कन्यादान आणि निरोप विधी तिच्या लग्नात झाले नसल्याचेही दियाने सांगितले. सजावटीसाठीही पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला गेला होता.

दियाच्या कामाबद्दल बोलयचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत होते. दियानेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये तेलुगु चित्रपट ‘वाईल्ड डॉग’चा समावेश आहे. यात दिया प्रिया वर्माच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.