ब्लॅक टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये दिसल्या ६२ वर्षीय नीना गुप्ता; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

अभिनेत्री नीना गुप्ता यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संघर्षाने भरलेले आहे, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. ‘बधाई हो’ चित्रपटाच्या यशामुळे नीना गुप्ता यांना बॉलिवूडमध्ये एक नवीन आणि वेगळी ओळख मिळाली. त्या आज प्रत्येक दिग्दर्शक निर्मात्याच्या यादीत आहेत. त्या चित्रपटांबद्दल तसेच त्यांच्या फॅशनबद्दल बऱ्याच चर्चेत असतात. त्या अनेकदा त्यांच्या अनेक ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर करून चाहत्यांना पूर्णपणे चकित करतात. चाहत्यांनाही त्यांचा हा अंदाज प्रचंड आवडतो.

नीना गुप्ता दिसल्या ग्लॅमरस लूकमध्ये
सोशल मीडियावर ६२ वर्षीय नीना गुप्ता बऱ्याच सक्रिय आहेत. त्या अनेकदा त्यांच्या नवीन लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. अलीकडेच नीना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक अतिशय सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडिओमध्ये नीना गुप्तांची वेगळी स्टाईलच नाही, तर ग्लॅमरस लूकही पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये त्यांना ओळखणे प्रत्येकासाठी खरोखर कठीण आहे.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्तांना झाली पुन्हा जगण्याची इच्छा
ब्लॅक टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये नीना या व्हिडिओमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. यासोबत त्यांनी खांद्यावर बॅग घेतली आहे. लहान केसांमध्ये नीनांचा हा नवा लूक पाहून प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे. व्हिडिओमध्ये नीना ‘आज फिर जीने की तमन्ना है’ या जुन्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत नीना गुप्ता यांनी लिहिले की, “आज पुन्हा जगण्याची ईच्छा आहे.”

चाहत्यांकडून मिळतंय प्रेम
नीना गुप्तांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “मला तुमची जगण्याची पद्धत खूप आवडते.” दुसऱ्याने लिहिले, “तुम्ही खूप सुंदर आहात.” आणखी एकाने लिहिले की, “तुम्ही नेहमीप्रमाणे जबरदस्त आणि सुंदर दिसत आहात. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. आपण सर्वांनी आपले आयुष्य पूर्णपणे जगले पाहिजे.” याशिवाय, अनेक कलाकारांनी नीना गुप्तांच्या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नीना गुप्ता त्यांच्या आत्मकथेमुळे आल्या चर्चेत
नीना गुप्ताने काही महिन्यांपूर्वी करीना कपूर खानच्या शोमध्ये त्यांची आत्मकथा ‘सच कहूं तो’ ऑनलाईन लाँच केले होते. त्यांच्या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. त्यामध्ये त्यांनी आपल्या लग्नाबद्दल, त्यांची मुलगी ‘मसाबा’ला वाढवण्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील मोठ्या चुकांबद्दल सांगितले आहे. त्यांचे पुस्तक लाँच करताना नीना गुप्ता म्हणाल्या की, “जर कोणी माझ्या चुकांमधून शिकले, तर मी समजेल की, माझी कथा यशस्वी झाली आहे.”

आगामी चित्रपट
नीना गुप्ता यांनी २०१७ मध्ये त्यांच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धडक दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे मोठ-मोठ्या प्रोजेक्ट्सच्या रांगा लागल्या. त्यांनी चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारली होती. सध्या नीना गुप्ता अमिताभ बच्चनसोबत त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाबद्दल खूप उत्साहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

Latest Post