Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

मासिक पाळीत काय करायचं? नाट्यगृहाच्या अवस्थेवर संतापल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांनी आज कोणत्या ही ओळखेची गरज नाही. नुकतेच निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांच्या अवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. नुकतंच त्यांनी एका युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत नाट्यगृहांची अवस्था अजूनही जशी होती तशीच असल्याचे सांगितले.

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) म्हणाल्या, “नाट्यगृहांची परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही. अनेक ठिकाणी महिला काम करतात. त्यावेळी त्यांना मानसिक पाळी येते. अशा वेळी त्या महिलांनी काय कराव असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. हे फार मोठ दुर्देव आहे. जुन्या नाट्यगृहांमध्ये कचऱ्याचे डबे नसायचे आणि आताही कुठे ते दिसत नाहीत. अशा वेळी मासिक पाळीदरम्यान महिलांनी करायचं काय? ”

तसचे निवेदिता सराफ पुढे बोलताना म्हणाल्या की, “अनेक वेळा शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह दिली जातात.ते पाहण्यासाठी लोक फार लांबचा प्रवास करून येतात. पुण्यातील बालगंधर्वसारख्या नाटयगृहातील नाटकांना लोक लांबून येतात. त्यामध्ये महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध माणसंही बसलेली असतात. अगोदरचा कार्यक्रम संपेपर्यंत दरवाजा बंद ठेवला जातो. बाहेर बसायला जागा नाहीये. कुठे बसणार ती माणसं? बाथरुमला कुठे जाणार? अनेकदा आम्हीही बाहेर ताटकळत उभे राहतो. आम्हाला मेकअप रुम देखिल भेटत नाही. सगळी नाट्यगृह प्रायवेट ट्रस्टला देण्याची प्रचंड गरज आहे.”

निवेदिता सराफ यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्याशी सहमती दर्शवली आहे तर काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक यशस्वी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांची ओळख फक्त चित्रपटांपुरतीच मर्यादित नाही. त्या मराठी रंगभूमीवरही सक्रिय आहेत. सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीपासूनच केली. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे आणि त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. (Nivedita Saraf is angry with the condition of the theater because of the plight of women during menstruation)

आधिक वाचा-
थलापथी विजयच्या चाहत्यांंचे चिड आणणारे कृत्य; थेट रस्त्यावर वाहणे थांबवून फोडले नारळ, पाहा व्हिडिओ
मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविडसोबत आहे खास नातं? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा