Sunday, October 1, 2023

‘नवलाई माझी लाडाची लाडाची गं’ गाण्यावर थिरकल्या निवेदिता सराफ; चाहते म्हणाले, “आमची अप्सरा…”

नव्वदच्या दशकातील अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. यातील एक नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ होय. निवेदिता या मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणुन देखील ओळखल्या जातात. मराठी चित्रपटात काम केल्यानंतर त्या मराठी मालिकांमध्ये देखील झळकल्या. त्या सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असतात.

सध्या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ ( Nivedita Saraf) या मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये सक्रिय असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर निवेदिता या त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच निवेदिता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत. निवेदिता यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ परदेशातील आहे. अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे नाटक ‘व्यॅक्यूम क्लिनर’साठी परदेशी दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यानचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘व्यॅक्यूम क्लिनर’ या नाटकाची निर्मिती निवेदिता यांनी केली असून अशोक सराफ यांनी मुख्य भूमिकेत आहेत. परदेशात नाटकाच्या टीमबरोबर निवेदिता मराठी गाण्यावर थिरकल्या आहे. ‘नवलाई माझी लाडाची लाडाची गं’ या गाण्यावर निवेदिता यांनी जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “अतिशय सुंदर नृत्य निवेदिता ताई..” दुसऱ्याने लिहीले की, “वेस्टर्न लुकमध्ये पण गोड दिसताय निवेदिता ताई.” तिसऱ्याने लिहिले की, “आमची अप्सरा सुंदर दिसत आहे.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात चर्चेत आला आहे. (Actress Nivedita Saraf’s dance video on the song ‘Navalai Majhi Ladachi Ladachi Gam’ went viral)

अधिक वाचा- 
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “तुमच्या…”
मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीचा आईसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा