‘रवी दुबे एक बेस्ट किसर आहे’, असं निया शर्माने म्हणातच रवीच्या बायकोची आली अशी प्रतिक्रीया


निया शर्मा हीचा बॉलीवूडच्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लूक्स आणि रोल सोबत आजकाल तिचे बोलणे देखील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच तिने तिचा को-स्टार आणि मित्र रवी दुबे याच्यावर अशी टिपण्णी केली आहे की, ते ऐकून त्याची बायको हैराण झाली आहे. आताच झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्डमध्ये नीयाने सांगितले की, रवी दुबे हा एक बेस्ट किसर आहे.

रवी दुबे आणि नीया शर्माने वेब शो ‘जमाई राजा 2.0’ यामधे एकत्र काम केले होते. या शोसाठी दोघांनीही अंडर ग्राउंड किसींग सीन शूट केला होता. त्याचं सीनला आठवणीत ठेवून नियाने रवीला बेस्ट किसर असे संबोधले आहे. यानंतर रवी दुबेच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने नीयाच्या या वक्तव्यानंतर त्याची आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया आली हे सांगितले.

रवीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना असे सांगितले की,” नीयाचे हे बोलणे ऐकून मी तर हैराण झालो होतो, मी आणि माझी पत्नी सरगून आम्हाला दोघांना देखील नीया खूप आवडते. तिचे हे बोलणे ऐकून माझी पत्नी खूप मोठमोठ्याने हसायला लागली होती. कारण ती नीयाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते.”

रवी दुबेने एका इंटरव्ह्यूमध्ये बोल्ड सीनबद्दल सांगितले की,” पहिल्या सिजनला मी खूपच संकोच करत होतो. परंतु आता तसे काही होत नाही, आणि याच सगळं श्रेय नीयाला जातं. हे सीन मुलींवर अवलंबून असतात की, त्या कश्याप्रकारे हे सीन हाताळतात आणि नीयाला हे खूप चांगल्या प्रकारे जमते. तिच्या सोबत तुम्ही कोणत्याही फिलिंग शेअर केल्या तरी, तुम्हाला काही वेगळे वाटतं नाही.”

त्यानंतर रवी म्हणतो की,” मी एक प्रोफेशनल ॲक्टर आहे. मला आता ह्या गोष्टी समजल्या आहेत की, स्क्रिप्टमध्ये काही सीन असे असतात की, ते तुम्हाला समजून घेऊन करावे लागतात आणि ह्या गोष्टी मला दुसऱ्या सिझनला समजल्या आणि यासाठी मी नीयाचे आभार मानतो.”


Leave A Reply

Your email address will not be published.