‘लॉकअप’ हा शो थीममुळे जबरदस्त चर्चेत आला आहे. या शोमध्ये स्वतःला बाहेर पडण्यापासून वाचवण्यासाठी स्पर्धकांना त्यांचे रहस्य सांगावे लागत आहेत. अलीकडेच, या कार्यक्रमातील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक, मुनव्वर फारुकी याने खळबळजनक खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मनुवरने सांगितले की, तो लहानपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडला होता.
मुनव्वर यांचे हे बोलणे ऐकून तेथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. यानंतर कंगना देखील लैंगिक शोषणाबाबत बोलते. शोदरम्यान तो म्हणाला की, दरवर्षी अनेक मुलांना शोषणाला सामोरे जावे लागते, आम्ही सार्वजनिक मंचावर कधीही चर्चा करत नाही. लहान वयात नको असलेल्या स्पर्शाचा सामना जवळजवळ प्रत्येकालाच होतो. यादरम्यान स्वत:सोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्याने सांगितले की, तो देखील याची शिकार झाली आहे.
यावर कंगनाने सांगितले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या गावात तिच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा मुलगा तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचा, पण नंतर तिच्या लहान वयामुळे तिला काहीच कळत नव्हते की तिच्यासोबत काय होत आहे? लहान मुलांनाही असे शिक्षण देता येत नाही, कारण लहान असल्यामुळे मुलांना काहीच समजत नाही, असे कंगनाने सांगितले. अशा घटनांमुळे मुलांच्या मनात आयुष्यभराची भीती निर्माण होते, असे ती म्हणाली.
या शोमध्ये वाद भांडण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. परंतु तेवढेच मजेशीर किस्से देखील ऐक्याला मिळत असतात. त्यामुळे तिचा हा शो सध्या चांगलाच लोकप्रिय होत चालला आहे.
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- लतादीदींचे भाऊ हृदयानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, मुलगा आदिनाथने दिली माहिती
- मुलाला जन्म देताना अशी झाली होती ‘या’ स्टारची हालत, शेअर केला डिलिव्हरी रूमचा व्हिडिओ
- ‘लग्न झालंय का चित्रपटाचं शूटिंग?’, सिंदूर अन् मंगळसूत्राविना आलिया भट्टला पाहून भडकले युजर्स