Wednesday, July 3, 2024

यूट्यूबवर ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने केला राडा! नोरा फतेहीच्या डान्सने पुन्हा एकदा जिंकली प्रेक्षकांची मनं

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही एक लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच चित्रपटात अभिनय देखील केला आहे. पण आता या वेळेस तिचा अभिनय आणि गाण्याचा आस्वाद प्रेक्षकांना एकत्र घेता येणार आहे. नोरा लवकरच अजय देवगणच्या आगामी ‘भुज :‌‌ द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. ती पुन्हा एकदा लाखो हृदयांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिना रहमान हे पात्र निभावनारी नोरा या चित्रपटात जोरदार ठुमके लावताना देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे बहुप्रतिक्षित गाणे ‘जालिमा कोका कोला’ या गाण्याचा डान्स व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या गाण्यातील नोराचा डान्स बघून आता प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

नोरा फतेहीचे हे नवीन गाणे ‘जालिमा कोका कोला’ श्रेया घोषालने गायले आहे. तसेच या गाण्याचे बोल वायुने लिहिले आहे. हे गाणे टी- सीरिजच्या बॅनरखाली प्रदर्शित केले आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोराने निळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप घातलेला आहे. यासोबतच हातात बांगड्या आणि सगळी ज्वेलरी खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. (Nora fatehi’s new song zaalima coca cola release, fans are crazy for her dance)

अजय देवगणचा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, एमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी १९७१ मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धातील वायू सेनेच्या बहादुरीवर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात १०० टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप

-‘कुंदन’ बनत बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या धनुषने केवळ सहा मिनिटात लिहिले होते ‘कोलावेरी डी’; वाचा त्याचा सिनेप्रवास

-आपली ‘आयडल’ माधुरी दीक्षितला हटके अंदाजात ट्रिब्यूट देणार नोरा फतेही; ‘चंद्रमुखी’च्या अवतारात दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा