पॅपराजींना पोझ देताना नोरा फतेही व्हिडिओत कैद, नेटकऱ्यांनी म्हटले, ‘किम कर्दाशियन २.०’


अभिनयाने आणि डान्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तसेच तिच्या फिटनेसची देखील इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा असते. सोशल मीडिया आणि तिचा तर अगदी जवळचा संबंध. तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. त्यामुळे तिच्या पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाहीत. अशातच नोरा फतेहीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे ती पॅपराजींना पोझ देताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ वूम्पलाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोरा कारमधून आलेली असते, तेव्हा तिचा ड्रायव्हर गाडीचा दरवाजा उघडतो आणि ती खाली उतरते. ती तिच्या ड्रायव्हरसोबत बोलत असते. तितक्यात पॅपराजी तिला “नोरा मॅम इकडे बघा,” असं म्हणत असतात. ती देखील त्यांना नाराज न करता पोझ देतात दिसत आहे. ती नंतर मास्क काढून पोझ देताना दिसली आहे. (Nora fatehi’s video viral on social media while giving pose)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोराने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. तसेच हातात पांढऱ्या रंगाची बॅग घेतली आहे. तसेच हिल्स घातले आहेत. या लूकमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

नोराला पाहून अनेक युजर्स तिची तुलना किम कर्दाशियनशी करत आहेत. दुसरीकडे युजर्स तिला ‘किम कर्दाशियन २.०,’ म्हणत आहेत.

नोरा ही एक अभिनेत्री तसेच एक डान्सर देखील आहे. डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे हाय गर्मी से गाणे लोकप्रिय झाले आहे.

ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.