Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड आपला आगामी सिनेमा रिलीझ होण्यापूर्वीच झाला होता ‘या’ नामांकित विनोदी कलाकाराचा मृत्यू

आपला आगामी सिनेमा रिलीझ होण्यापूर्वीच झाला होता ‘या’ नामांकित विनोदी कलाकाराचा मृत्यू

सध्या छोट्या पडद्यावर अनेक विनोदी कार्यक्रम प्रसारित होत आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या पडद्यावरसुद्धा अनेक विनोदी सिनेमांना प्राधान्य दिले जाते. एकीकडे एखादा ऍडल्ट विनोदी सिनेमा शंभर कोटींच्यावर कमाई करतो, तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील निखळ विनोदी कार्यक्रमांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसतात. यामध्ये कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल ‘ हा कार्यक्रम अपवाद वगळला, तर कपिल शर्मा व्यतिरिक्त एक असा चेहरा आहे, ज्याचे नाव विनोद जगतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ते म्हणजे ‘जसपाल भट्टी’.

आपल्या बोचऱ्या नसलेल्या, साध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडतील असे होते जसपाल. सोबतच आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे अनेक प्रश्न ते उपहासात्मक पद्धतीने मांडत असत. सन १९८० आणि ९०चे दशकात त्यांनी चांगली कामगिरी केली. ‘उलटा पुलटा’ आणि ‘फ्लॉप शो’ या टीव्ही सीरिजसाठी जसपाल भट्टी नेहमी ओळखले जायचे. त्यांच्या कॉमेडीचे अनेक चाहते त्यावेळी होते. ते नेहमीच देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर विनोदी अंदाजात टीका करताना दिसायचे.

आपल्या महाविद्यालयीन काळापासूनच त्यांना भ्रष्टाचारावर अनेक विनोद करणारी पथनाट्ये करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर ते चंदीगडच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. त्यावेळी सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवणारी त्याची ती व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांचा ‘फ्लॉप शो’ हा पहिलावहिला कार्यक्रम आजही हिट शो पैकी एक म्हणून गणला जातो.

त्यांचा ‘उलटा पुलटा’ हा कार्यक्रम देखील फार लोकप्रिय झाला होता. मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जगण्यातून, आणि त्यांच्या परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या या दोन्ही दूरदर्शनवरील मालिकांनी प्रेक्षकांची मने चांगलीच जिंकली होती.

आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. कधी सकारात्मक, कधी नकारात्मक, तर कधी निराशावादी म्हणण्यास हरकत नाही. परंतु विनोदाचा जसपाल भट्टी नामक बादशाहचा आपल्या आयुष्याकडे पाहायचा दृष्टीकोन मुळात विनोदी होता. त्यांनी आपल्या ‘जोक फॅक्टरी’ स्टुडिओ सोबतच ‘मॅड आर्ट’ ही प्रशिक्षण संस्था देखील स्थापन केली होती.

आपल्या ‘पावर कट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना २५ ऑक्टोबर २०१२ मधील आहे. ही घटना जालंधरच्या शाहकोटमध्ये घडली होती. त्यावेळी त्यांचे वय फक्त ५७ इतके होते.

सन २००८ च्या ‘नच बलीये’ या कार्यक्रमात देखील त्यांनी आपल्या पत्नीसोबत भाग घेतला होता आणि आपले नृत्यकौशल्य दाखवले होते. केवळ कार्यक्रम नव्हे, तर चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. यात ‘फना’, ‘कुछ मिठा हो जाए’, ‘कुछ ना कहो’, ‘कोई मेरे दिल से पुछो’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘इकबाल’ आणि ‘कारतूस’ या चित्रपटांचा यात समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-“माझ्या मुलांनाही प्रश्न पडला होता की, आपले पप्पा घरी का असतात?” बॉबी देओलने शेअर केला वाईट काळातील किस्सा

 

हे देखील वाचा